Fake Ram Rahim: तुरुंगात असलेला राम रहीम बनावट

| Updated on: Jul 03, 2022 | 11:54 PM

खऱ्या राम रहिमचे राजस्थानमधील उदयपूर येथून अपहरण करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगातून बाहेर येऊन उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात राहणाऱ्या राम रहीमची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Fake Ram Rahim: तुरुंगात असलेला राम रहीम बनावट
Follow us on

चंदीगड : तुरुंगात असलेला राम रहीम बनावट असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. डेराचे भक्त अशोक कुमार आणि चंदीगडमध्ये राहणार्‍या काही जणांनी हा दावा केला आहे. बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

खऱ्या राम रहिमचे राजस्थानमधील उदयपूर येथून अपहरण करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगातून बाहेर येऊन उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात राहणाऱ्या राम रहीमची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तुरुंगातून बाहेर आलेल्या या राम रहीमचे हावभाव पूर्वीसारखे राहिलेले नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी हरयाणा सरकार, हनीप्रीत आणि सिरसा डेरा प्रशासक पीआर नैन यांना या प्रकरणात पक्षकार केले आहे.

तुरुंगातून बाहेर आलेल्या डेरा प्रमुखामध्ये बरेच बदल जाणवत आहेत. असंही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. केवळ वागण्यातच नाही तर शारीरीक बदलही जाणवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याचिकाकर्त्यांनी कथित डेरा प्रमुखाचा व्हिडीओच प्रसारित केला आहे. डेरा प्रमुखाची उंची एक इंच वाढली आहे. बोटांची लांबी आणि पायांचा आकारही वाढला असल्याचे यांचे म्हणणे आहे. व्हीडिओत त्याच्या चेहऱ्यावर आणि हातात मास्क होता, जो बदललेला दिसत आहे. याचिका दाखल करणाऱ्यांनी सांगितले की, काही कथित डेरा प्रमुखाच्या काही दिवसांपूर्वी त्याचे काही जुने मित्र ज्यांना तो ओळखू शकला नाही. त्यावरून तो बनावट डेरा प्रमुख असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे यांचे म्हणणे आहे.