भूकंपातही राम मंदिर मजबूत राहणार, बांधकामात काय आहे रहस्य ?
अयोध्येच्या राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारीला मोठ्या पारंपारिक आणि धार्मिक रितीने होणार आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी 17000 ग्रेनाईट दगडांसह राजस्थानच्या मिर्झापूर येथील आणि बंसी-पहाडपूर येथील गुलाबी बलुआ खडकांचा तसेच संगमरवराचा वापर केला आहे. जर एखादे नैसर्गिक संकट आले तरी या मंदिराला काहीही धोका नसल्याचे म्हटले जात आहे.
अयोध्या | 7 जानेवारी 2024 : राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशी अयोध्यानगरीसह सर्वत्र चैतन्य पसरत चालले आहे. येत्या 22 जानेवारीला विविवध राम मंदिराचे लोकार्पण सोहळा रंगणार आहे. त्यानंतर 23 जानेवारीपासून रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. या राम मंदिराचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर ते जगातील तिसरे सर्वात मोठे मंदिर ठरणार आहे. स्थापत्यशास्राचा अद्भूत नजराणा असणारे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. विशाल आकाराचे हे मंदिर नैसर्गिक संकटात टीकणार की नाही असे प्रश्न सर्वसामान्याच्या मनात आहेत. त्यामुळे हे मंदिर भूकंपातही तग धरू शकणार का ? तर जाणून घेऊया या मंदिराची खास वैशिष्ट्ये….
अयोध्येचे हे मंदिर संपूर्णपणे भूकंपरोधक असणार आहे. हे मंदिर किमान 1000 वर्षे टिकून रहाण्यासाठी तयार केले आहे. श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या मते येत्या एक हजार वर्षांपर्यंत या मंदिराला डागडुजीची काही गरज लागणार नाही. हे मंदिर जर 6.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्काही झेलू शकते. या मंदिराच्या खांबांचा पाया नदीवर बनलेल्या पुलांसारखा खोल आहे. मंदिराच्या बांधकामासाठी लोखंड किंवा स्टीलचा वापर केलेला नाही. त्याऐवजी 21 लाख घन फूट ग्रेनाईट, बलुआ खडक आणि संगमरवरी दगडांचा वापर केला आहे. पायासाठी वापरलेला माती केवळ 28 दिवसांत दगडात परावर्तित होऊ शकते. पायात 47 स्तरात ही माती नीट टाकली आहे. या मंदिराच्या पायाची खोली 50 फूट इतकी आहे. मंदिराच्या बेसला बनविण्यासाठी 400 फूट लांब आणि 300 फूट रुंदीचा खड्डा तयार केला. त्यास कॉम्पॅक्ट सिमेंट, फ्लाय एश आणि छोट्या दगडांसह अन्य वस्तूंनी अनेक लेअरनी भरले आहे. भिंतीची जाडी वाढवीली आहे. मंदिराचे डिझाईन चंद्रकांत सोमपुरा यांनी केले आहे.
राम भक्तांच्या वीटांचाही वापर
राम मंदिराची निर्मिती 17,000 ग्रेनाईट दगडांसह राजस्थानच्या मिर्झापुर आणि बंसी-पहाडपूर येथील गुलाबी बलुआ खडकांचा तसेच संगमरवरी दगडांचा नक्षीदारीसाठी वापर केला आहे. विशेष म्हणजे 1992 च्या ‘शीला दान’ आंदोलनावेळी राम भक्तांनी दान केलेल्या सर्व विटांचा वापर निर्मितीत केला आहे. मुख्य मंदिर 2.7 एकरवर पसरले आहे. त्याची एकूण लांबी 360 फूट आणि रुंदी 235 फूट इतकी आहे. शिखरासह मंदिराची उंची 161 फूट आहे. या मंदिरात तीन मजले असणार आहेत.