Ramadan eid 2022 : आज शेवटचा रोजा! राज्यासह देशभारत उद्या साजरी होणार ईद

ईद महिना संपल्यानंतर चंद्र दिसला, की ईद साजरी केली जाते.

Ramadan eid 2022 : आज शेवटचा रोजा! राज्यासह देशभारत उद्या साजरी होणार ईद
उद्या ईद साजरी होणारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 6:51 AM

नवी दिल्ली : भारतात 3 मे रोजी ईद साजरी  (Eid Celebration) केली जाईल. सौदीमध्ये ईदचा चंद्र न दिसल्यानं तिथं आज ईद (EID) साजरी केली जाते आहे. त्याच्या बरोबर एक दिवस नंतर म्हणजेच उद्या (3 मे) रोजी ईद साजरी केली जाईल. मरकजी चांद कमिटीकडून एक पत्रक जारी करत याबाबतमी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज महिन्याचा शेवटचा रोजा करण्यात येईल. दिवसाच्या सुरुवातीला सहेरी करुन आणि दिवस संपताना म्हणजेच सूर्यास्तानंतर इफ्तारी करुन उपवास सोडला जाईल. रविवारी खरंतर मुस्लिम बांधवांना चंद्रदर्शन होईल, अशी अपेक्षा होता. मात्र तसं झालं नाही. अखेर आता उद्या ईद साजरी (Ramadan eid 2022) केली जाईल. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आता मंगळवारी ईदचा उत्साह पाहायला पाहायला मिळेल. देशभरात 1 तारखेला चंद्रदर्शन होऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र न झाल्यानं आता संपूर्ण 3 मे रोजी ईद साजरी होईल. यालाच ईद-उल-फित्र असंही म्हणतात. ईल-उल-फित्र म्हणजेच रोजा (उपवास) सोडताना साजरा केला जाणारा सण होय.

ईद महिना संपल्यानंतर चंद्र दिसला, की ईद साजरी केली जाते. ईदच्या दिवशी गोडधोड पदार्थ बनवून सण साजरा केला जोता. नवे कपडे घालून मशिदीत जाऊन नमान पठण आणि प्रार्थना केली जाते. या पारंपरिक प्रार्थनेआधी गरिबांना दान दिलं जातं. याला जकात असंही म्हणतात. यानंतर केल्या जाणाऱ्या प्रार्थनेनंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन उपवास सोडून मनसोक्त जेवणं केलं जातं.

सार्वजनिक सुट्टी आणि कडक बंदोबस्त

दरम्यान, रमजानच्या पार्श्वभूमीवर देशभरात साजऱ्या होणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्तही करण्यात आला आहे. ईदनिमित्त भारतासह जगातील वेगवेगळ्या देशात सार्वजनिक सुट्टीही असते.

आज शेवटचा उपवास…

आठवडाभर कडक रोजे ठेवलेल्या मुस्लिम बांधवांच्या उपवासाचा आज शेवटचा दिवस म्हणजेच तिसावा दिवस असणार आहे. यानंतर मंगळवारी रमजान ईद साजरी केली जाईल.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.