UP Assembly bye election | रामदास आठवलेंचा भाजपला पाठिंबा, 7 मतदारसंघात पोटनिवडणूक
उत्तर प्रदेशमधील 7 विधानसभा मतदरासंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपला रामदास आठवलेंच्या आरपीआयची साथ मिळणार आहे. आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष पवन गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. Ramdas Athawale Yogi Aadityanath
लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 7 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. (RPI supports BJP for assembly bye election in UP)
रामदास आठवलेंचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी आहे. आता उत्तर प्रदेशात होत असलेल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपसोबत राहण्याचा निर्णय आठवले यांनी घेतला आहे. आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष पवन गुप्ता यांनी उत्तर प्रदेश भाजपचे संघटन मंत्री सुनील बन्सल (Sunil Bansal) यांची भेट घेतली आणि पाठिंब्याची घोषणा केली.
रामदास आठवले यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश च्या 7 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (By Poll)भाजपला पाठिंबा देण्याच निर्णय घेण्यात आला आहे, असे पवन गुप्ता यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये फिरोजाबाद मधील टूंडला, उन्नाव मधील बांगरमऊ, जौनपूर मधील मल्हनी, देवरियाच्या सदर, बुलंदशहर, कानपूर मधील घाटमपूर आणि अमरोहा मधील नौगाव मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
केंद्र सरकारमध्ये रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये आरपीआयचा विस्तार होत आहे, असेही पवन गुप्तांनी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमधील मत्रीमंडळात रामदास आठवले यांच्याशिवाय इतर एनडीएमधील एकाही पक्षाचा नेता नाही.
संबंधित बातम्या:
खडसेंनी राष्ट्रवादीत आधीच जायला हवं होतं, आता ‘रिपाइं’त या, सरकार आणू : आठवले
रामदास आठवलेंकडून आरे कॉलनीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट, 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा
(RPI supports BJP for assembly bye election in UP)