IMA कडून रामदेव बाबांना 1000 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस, 15 दिवसात माफी मागण्याचा अल्‍टीमेटम

नवी दिल्ली : डॉक्टरांवरील वादग्रस्त वक्तव्यावरुन रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रामदेव बाबांनी (Ramdev Baba) अॅलोपथीवर केलेल्या आरोपांवर आता उत्तराखंड इंडियन मेडिकल काऊंसिलने (IMA Uttarakhand) त्यांना 1000 कोटी रुपयांच्या बदनामी केल्यानं नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये रामदेव बाबांना पुढील 15 दिवसात आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ आणि लेखी माफी मागण्याचा अल्टिमेटम […]

IMA कडून रामदेव बाबांना 1000 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस, 15 दिवसात माफी मागण्याचा अल्‍टीमेटम
योगगुरु रामदेव बाबा
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 5:00 PM

नवी दिल्ली : डॉक्टरांवरील वादग्रस्त वक्तव्यावरुन रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रामदेव बाबांनी (Ramdev Baba) अॅलोपथीवर केलेल्या आरोपांवर आता उत्तराखंड इंडियन मेडिकल काऊंसिलने (IMA Uttarakhand) त्यांना 1000 कोटी रुपयांच्या बदनामी केल्यानं नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये रामदेव बाबांना पुढील 15 दिवसात आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ आणि लेखी माफी मागण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय (Ramdev Baba get 1000 crore defamation notice by IMA Uttarakhand for controversial statement over allopathy).

आयएमएने आपल्या नोटीसमध्ये म्हटलंय, “जर रामदेव बाबांनी पुढील 15 दिवसात स्पष्टीकरणाचा व्हिडीओ आणि लेखी माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडून बदनामी केल्याप्रकरणी 1000 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली जाईल.” याशिवाय नोटीसमध्ये रामदेव बाबांनी 72 तासाच्या आत कोरोनील किटच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सर्व ठिकाणाहून हटवाव्यात, अशीही मागणी आयएमएने केलीय. या जाहिरातींमध्ये रामदेव बाबांनी कोरोनील कोविड व्हॅक्सिननंतर होणाऱ्या साईड इफेक्टवर प्रभावी असल्याचा दावा केलाय.

6 पानांची नोटीस, 1000 कोटी रुपयांच्या दाव्याचा इशारा

रामदेव बाबांनी सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ हटवला नाही तर आयएमए उत्तराखंड त्यांच्यावर 1000 कोटी रुपयांचा दावा करेल, अशा इशारा देण्यात आलाय. आयएमएने रामदेव बाबांना 6 पानांची नोटीस पाठवली आहे.

आयएमएचा रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याचाही इशारा

नोटीसमध्ये आएमएने रामदेव बाबांच्या वक्तव्याने आयएमए उत्तरखंडशी संबंधित 2 हजार डॉक्टरांचा अपमान झाल्याचं सांगितलं. तसेच एका डॉक्टरच्या बदनामीच्या 50 लाख रुपयांप्रमाणे आम्ही 1 हजार कोटी रुपयांची मागणी करतो, असं म्हटलंय. रामदेव बाबांनी आपल्या वक्तव्याने सोशल मीडियात अॅलोपथीच्या डॉक्टरांची बदनामी केल्याचा आरोपही आयएमएने केलाय. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.