रामलल्ला दर्शनासाठी निघालात? या अटी शर्ती पाहाच, यांनाच मिळेल प्रथम संधी

एक महिन्याचा काळात अयोध्येतील राम लल्लाचे अनेक भाविकांनी दर्शन घेतले. कोटीच्या कोटी रुपये दानपेटीत जमा झाले. भाविकांची दिवसेदिवस संख्या वाढत आहे. त्यामुळे आता सरकारने रामलल्लाच्या दर्शनासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

रामलल्ला दर्शनासाठी निघालात? या अटी शर्ती पाहाच, यांनाच मिळेल प्रथम संधी
Ayodhya Ram MandirImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 4:57 PM

उत्तर प्रदेश | 22 फेब्रुवारी 2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला 22 फेब्रुवारील एक महिना पूर्ण झाला. एक महिन्याचा काळात अयोध्येतील राम लल्लाचे अनेक भाविकांनी दर्शन घेतले. कोटीच्या कोटी रुपये दानपेटीत जमा झाले. भाविकांची दिवसेदिवस संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता सरकारने रामलल्लाच्या दर्शनासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची निवड लॉटरीद्वारे केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना श्री रामलल्ला दर्शन योजनेबाबत तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अयोध्या स्पेशल ट्रेनने येणाऱ्या भाविकांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अयोध्या स्पेशल ट्रेनसाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींची प्राधान्याने निवड केली जाणार आहे.

योजनेतील उर्वरित अर्जदारांना पुढील काळात क्रमशः प्रवास करत येणार आहे. सरकारच्या या योजनेसाठी लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 75 वर्षे असेल. या योजनेचे 25 टक्के लाभार्थी शहरी भागातील तर 75 टक्के लाभार्थी ग्रामीण भागातील असतील. वृद्ध लोकांना त्यांच्यासोबत एका साथीदारांला नेण्याची परवानगी असेल.

जास्त प्रवासी असल्यास लॉटरीद्वारे निवड

अयोध्येत जाण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून उपलब्ध कोट्यानुसार प्रवाशांची निवड केली जाणार आहे. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 25 टक्के अतिरिक्त लोकांसाठीही प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवता येईल.

पती – पत्नी एकत्र जाऊ शकतील

अर्जदाराच्या जोडीदारापैकी एकाचे नाव निवडल्यास त्याच्यासोबत जोडीदारालाही प्रवास करता येणार आहे. पण, अर्ज करताना अर्जदाराला त्याचा जोडीदारही प्रवास करण्यास इच्छुक असल्याचे नमूद करावे लागणार आहे. अशावेळी जोडीदाराचाही अर्जही अर्जदाराच्या अर्जासोबत जोडावा लागेल.

इतरांना पाठवता येणार नाही

निवडक प्रवाशी यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानंतर केवळ निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. त्याला सोबत इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला सोबत घेऊन जातं येणार नाही. काही कारणास्तव निवड झालेल्या व्यक्तीला प्रवास करणे शक्य नसेल तर त्या जागी इतर कोणत्याही व्यक्तीला पाठवता येणार नाही अशा प्रकारची ही मार्गदर्शक तत्वे आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.