शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच कृषी कायदे, प्रजासत्ताक दिनाला जे झालं ते दुर्दैवी: रामनाथ कोविंद

नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना थोड्या काळातमध्येच लाभ झाला, असं राष्ट्रपतींनी सांगितले. (President Ramnath Kovind Address)

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच कृषी कायदे, प्रजासत्ताक दिनाला जे झालं ते दुर्दैवी: रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 12:03 PM

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानानं सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणामध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना थोड्या काळामध्येच लाभ झाला, असं राष्ट्रपतींनी सांगितले. सध्या या कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करु, असं राष्ट्रपतींनी म्हटलं. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या कायद्यांना पाठिंबा दिल्याचंही राष्ट्रपतींनी सांगितले. (Ramnath Kovind said Agriculture Acts are profitable for small farmers of India )

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी बोलताना 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. जे संविधान आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियम पाळण्याचं गांभीर्य देखील शिकवतं असं, रामनाथ कोविंद म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य कायदा, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) कायदा, हमीभाव आणि कृषीसेवा कायदा हे नवे कृषी कायदे लागू करण्यात आले असले तरी जुन्या कायद्यांद्वारे सुरु असलेल्या सुविधा, अधिकार कायम ठेवण्यात येतील, असं सांगितलं. कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना नव्या सुविधा आणि नवे अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी केंद्र सरकार आधुनिक कृषी पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यावर भर देत आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा अ‌ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुरु करण्यात आला आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

100 किसान रेल्वे सुरु

देशभरात सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वे भारतातील शेतकर्‍यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या ठरल्या आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक किसान रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. त्याद्वारेव 38 हजार टन धान्य, फळे आणि भाज्या एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात पाठविण्यात आल्या आहेत, असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

विरोधकांचा अभिभाषणावर बहिष्कार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. 16 राजकीय पक्षांनी याबाबत प्रसिद्धीत्रक जारी केले आहे. कृषी कायदे ज्या पद्धतीनं लादण्यात आले त्याचा विरोध दर्शवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली होती.

संबंधित बातम्या: 

‘भारत कोरोनाच्या फक्त दोनच लसींवर थांबणार नाही, लवकरच देशी बनावटीच्या पुष्कळ लसी तयार होतील’

कृषी कायद्यांवर विरोधक आक्रमक, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार

(Ramnath Kovind said Agriculture Acts are profitable for small farmers of India )

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.