घटस्फोटप्रकरणी न्यायालयात गेलेल्या राणी साहेबांचा मोठा निर्णय, लवकरच राजकारणात एंट्री?
आमदार राजा भैय्या यांच्या पत्नी भानवी सिंह यांनी 'लवकरच मी मैदानात उतरणार आहे' असे म्हटले आहे. विशेष म्हणजे राणी साहेब भानवी सिंह यांनी पती आमदार राजा भैय्या यांच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे उतर प्रदेशमधील राजकारण तापले आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जन सत्ता दल लोकतांत्रिक पक्षाचे कुंडा मतदार संघाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी राणी साहेब भानवी कुमारी सिंह यांनी न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. राजा भैया यांचा हा घटस्फोटाचा खटला सुरू असतानाच पत्नी भानवी सिंह यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे त्या लवकरच राजकीय क्षेत्रात उतरतील अशी अटकळ बांधली जात आहे.
राजा भैया आणि पत्नी भानवी सिंह यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. राणी साहेब भानवी सिंह यांनी दिल्लीच्या साकेत कोर्टात आपला जबाब नोंदवला. यावेळी भानवी सिंह यांनी आपल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. राजा भैय्या यांचे अवैध संबंध होते. तसेच, त्याच्या छेडछाडी प्रकरणांना त्यांनी सतत विरोध केला होता. मात्र, या विरोधामुळे राजा भैय्या यांनी आधी तिला मारहाण केली. धमकावले आणि नंतर घटस्फोटासाठी दावा ठोकला, असे भानवी सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.
राणी साहेब भानवी सिंह यांनी राजा भैय्या यांचे निकटवर्तीय आमदार अक्षय प्रताप सिंह गोपाल यांच्याविरुद्धही गंभीर आरोप केले आहेत. अक्षय प्रताप सिंह गोपाल यांनी बनावट मार्गाने आपली कंपनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत त्यांनी त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच दरम्यान भानवी कुमारी सिंह यांनी X वर एक पोस्ट केली आहे.
कभी कभी सोचती हूँ जब रियासत , राजघरानों से संबंधित महिलाओं को अपने सम्मान, गरिमा की रक्षा के लिए इतना संघर्ष करना पड़ता है। सरकार से याचना करनी पड़ती है और एक आईओ भी किसी की शह पर धमकी भरी भाषा में बात कर सकता है तो आम महिलाओं के साथ क्या होता होगा? अपनी व्यक्तिगत लड़ाई मैं ज़रूर…
— Bhanvi Kumari Singh Bhadri (@BhanviKumari) July 18, 2024
राणी साहेब भानवी सिंह यांनी X वर “कधीकधी मला वाटते जेव्हा राजघराण्यातील महिलांना त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यांना सरकारकडे विनवणी करावी लागते. एक आमदार धमकीची भाषा करतो. त्यावेळी सामान्य महिला कसे जगू शकतात याचा अंदाज आहे. माझी वैयक्तिक लढाई मी नक्कीच लढेन. पण, महिलांच्या हितासाठी लढण्याचा संकल्प घेऊन मी लवकरच मैदानात उतरेन. योग्य वेळेची वाट पहा असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.