Konkan Rains: कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू; रावसाहेब दानवे घेणार आढावा

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागात पूर आला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका कोकणला बसला आहे. (raosaheb danve)

Konkan Rains: कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू; रावसाहेब दानवे घेणार आढावा
raosaheb danve
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 11:28 AM

नवी दिल्ली: गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागात पूर आला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका कोकणला बसला आहे. पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू आहे. स्वत: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पावसामुळे उद्भवलेल्या मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. (raosaheb danve assured to help flood affected konkan, maharashtra)

रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई-कोकणासह राज्यातील पावसाने उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कोकणात पूर आल्याने कोकणवासियांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे रेल्वे सुद्धा प्रभावित झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या येण्याजाण्याची अडचण झाली आहे. कोकणवासियांचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करत आहोत. कोकणसाठी स्वतंत्र बैठक बोलावून कोकणातील पूरपरिस्थिती आणि नुकसानावर चर्चा करण्यात येणार आहे, असं दानवे यांनी सांगितलं.

रेल्वे प्रवास करून अडचण सोडवणार

रेल्वे रुळावर पाणी साचत आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. रुळावर पाणी कशामुळे साचते त्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. सध्या मुंबईत रेल्वे रुळावरील पाणी काढण्याचं काम सुरू आहे. 160 पंप लावून पाणी बाहेर काढलं जात आहे. मी स्वत: मुंबई महापालिकेशी संपर्क साधून आहे. तसेच मुंबईत आल्यावर पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. स्वत: ला रेल्वेतून प्रवास करून हा आढावा घेणार असून दरवेळी निर्माण होणाऱ्या समस्या दूर करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. बदलापूर, इगतपुरी आणि कसारा दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने येथील प्रवाशांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गणेशोत्सवासाठी 40 फेऱ्या वाढणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता 72 रेल्वेच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, वेटिंग लिस्ट मोठी असल्याने कोकणवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकच्या 40 फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई-कोकणवासियांसाठी वेटिंग लिस्ट वाढली तर अधिकच्या ट्रेन देऊ. ट्रेनचा खोळंबा होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोना नियमांचं पालन करूनच प्रवास करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. (raosaheb danve assured to help flood affected konkan, maharashtra)

संबंधित बातम्या:

Raigad Rain : रायगडमधील रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरु आहे?

Maharashtra Rain Live | कोल्हापुरात दुर्दैवाने 2019 सारखी स्थिती, दसरा चौकापर्यंत पाणी

Mumbai Rains: गोवंडीत घर कोसळून 3 ठार, 7 जखमी; ढिगारा उपसण्याचे काम सुरू

(raosaheb danve assured to help flood affected konkan, maharashtra)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.