‘अजित पवार पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पहाटेच्या शपथेवरुन कळले असतील’, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कायम आहेत. पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर आपल्याला कळलं असेल. अजित पवार आता पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत, असा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय.

'अजित पवार पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पहाटेच्या शपथेवरुन कळले असतील', रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ
रावसाहेब दानवे, अजित पवारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:18 PM

नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आलीय. राज्यातील सत्तापालटाला महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका करत आहेत. मात्र, त्याचवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजित पवारांबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कायम आहेत. पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर आपल्याला कळलं असेल. अजित पवार आता पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत, असा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय.

रावसाहेब दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कायम आहेत. पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर आपल्याला कळलं असेल. अजित पवार आता पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत. प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा पडला आहे. त्यांना माहिती आहे ईडी आणि सीबीआय त्यांचं काम करत आहे, हे त्यांनाही कळलंय. इतकंच नाही तर राज्यात सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. पुढच्या काळातही भाजपच सगळ्यात मोठा पक्ष राहील. आम्ही सगळ्यांना भूईसपाट करु. प्रत्येक पक्षाची काय स्थिती झाली राज्यात? असा सूचक प्रश्नही दानवेंनी केलाय.

तेव्हा का नाही निष्ठा आठवली? दानवेंचा सवाल

दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवलाय. हे आता म्हणत आहेत निष्ठेचं दूध पाजलं. यांनाही कुणीतरी निष्ठेचं दूध पाजलं होतं. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांनी युती घडवून आणली. त्यावेळीच ठरलं होतं ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री. त्यावेळी शिवसेनेचे जास्त आमदार आले, तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मग नंतर कुणाबरोबर गेले, तेव्हा का नाही निष्ठा आठवली, आताच का निष्ठा आठवली? असा सवाल दानवेंनी केलाय.

‘प्रादेशिक पक्ष संपणार, शिवसेनेची अवस्थाही वेगळी नाही’

शिवसेनेचे खासदार, आमदार आम्हाला खासगीत सांगतात. परिवारवादी पक्ष आहे. राज्याचं किंवा जनतेचं हित यांना कळत नाही, फक्त परिवाराचं हित कळतं. प्रादेशिक पक्ष संपणार आहेत. शिवसेनेचीही तीच अवस्था होईल. तो काय राष्ट्रीय पक्ष आहे का? प्रादेशिक पक्षच आहे, असा दावाही दानवे यांनी केलाय. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर आता दानवेंच्या या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.