चित्रपट पाहताना उंदीर चावला, आता सिनेमागृहाला इतक्या हजारांचा दंड
Assam : आसाममधील एका ग्राहक न्यायालयाने एका थिअटर मालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. चित्रपट पाहत असताना उंदीर चावल्यामुळे कोर्टाने थिअटरच्या मालकाला अशा पद्धतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
मुंबई : अध्यक्ष एएफए बोरा आणि सदस्य अर्चना डेका लाखर आणि तुतुमोनी देवा गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील कामरूप जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या खंडपीठाने (By the Commission Bench) नुकताच एक आदेश दिला आहे. त्यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. थिअटरमध्ये (Teather) स्वच्छता ठेवणे हे मालकाचे काम आहे. थिअटरमध्ये (cinema hall) खाण्याच्या अधिक वस्तू मिळत असल्यामुळे उंदाराची संख्या अधिक असते. परंतु स्वच्छता ठेवण्याचं काम थिअटर मालकाचं असल्यामुळे 67 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोर्टाने (court)25 एप्रिलला आदेश दिला आहे. तक्रारदार व्यक्तीने सांगितले होते की, त्या थिअरमध्ये रोजच्यारोज सफाई केली जात नाही. त्याचबरोबर कचरा टाकण्यासाठी सुनिश्चित अशी अद्याप जागा नाही.
20 ऑक्टोबर 2018 ची घटना
ही घटना 20 ऑक्टोबर 2018 मध्ये गुवाहाटीच्या भंगागढ़ येथील गैलेरिया थिअटरमध्ये झाली होती. पाच महिन्यानंतर पीडित व्यक्तीची तक्रार घेण्यात आली. ज्यावेळी पीडित व्यक्ती थिअरमध्ये गेली होती, चित्रपट पाहिल्यानंतर पीडित व्यक्तीच्या पायातून रक्त येत असल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी दोन तास त्या व्यक्तीला त्याचं जाग्यावर बसवण्यात आलं होतं. कारण नेमक कोणत्या उंदराने चावा घेतला आहे यासाठी. त्यानंतर पीडित व्यक्तीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
सहा लाखांची भरपाई मागितली होती
पीडित महिलेने थिअटरच्या मालकाकडे 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली. विशेष म्हणजे संबंधित तक्रार योग्य नसल्याचा युक्तिवाद थिअटर मालकाने केला. त्यावेळी थिअटरमधील लोकांचं सुध्दा योग्य वागणं नव्हतं. याला विरोध करत महिलेने सांगितले की, जेव्हा पीडित महिला याविषयी थिअटर मालकाकडे गेली. तेव्हा थिअटर मालकाने पीडित महिलेला पुढच्या सिनेमासाठी मोफत तिकीट देऊ केले.
67 हजार रुपयांची नुकसान भरपाई
हे सगळं प्रकरण थिअटर मालकाच्या चुकीमुळं झालं आहे. त्यामुळे कोर्टाने त्या पीडित महिलेला 67 हजार रुपयांची नुकसान भरपाई 45 दिवसांच्या आतमध्ये देण्यास सांगितले आहे. समजा 45 दिवसांच्या आतमध्ये हे पैसे झाले नाहीतर, तर संबंधित व्यक्तीला वार्षिक 12 टक्के दराने व्याज पैसै द्यावे लागतील.