Ratan Tata : ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करणार’, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा भावूक

'आयुष्याची शेवटती वर्षे आता आरोग्यासाठी समर्पित करणार. आसामला असं राज्य बनवा जे सगळ्यांना ओळखेल आणि सगळे आसामला ओळखतील', असं रतन टाटा म्हणाले.

Ratan Tata : 'आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करणार', ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा भावूक
रतन टाटा, ज्येष्ठ उद्योगपतीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 5:48 PM

दिब्रुगड, आसाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज आसाममध्ये 7 अत्याधुनिक कॅन्सर सेंटरचं उद्घाटन झालं. टाटा ट्रस्टच्या मॉडेलनुसार या रुग्णालयांची उभारणी करण्यात आले आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे (Tata Trust) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाही (Ratan Tata) उपस्थित होते. त्यावेळी बोलताना रतन टाटा भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. ‘आयुष्याची शेवटती वर्षे आता आरोग्यासाठी समर्पित करणार. आसामला असं राज्य बनवा जे सगळ्यांना ओळखेल आणि सगळे आसामला ओळखतील’, असं रतन टाटा म्हणाले. आपण हिंदीत बोलू न शकल्याबद्दलही त्यांनी सुरुवातीलाच उपस्थितांची माफी मागितली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, माजी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवालही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनीही मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी टाटा ट्रस्टचे आभार मानले. केवळ आसाम नाही तर ईशान्य भारतासाठी कॅन्सर ही एक मोठी समस्या राहिली आहे. यामुळे सर्वाधिक प्रभावित आमचा गरीब आणि मध्यम वर्गीय परिवार होतो. कॅन्सरवरील उपचारांसाठी काही वर्षांपर्यंत इथल्या रुग्णांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गियांवर मोठा आर्थिक ताण येत होता. गरीब आणि मध्यमवर्गियांची ही समस्या दूर करण्यासाठी 5 – 6 वर्षात पावलं टाकण्यात आली आहेत. त्यासाठी मी सर्वानंतर सोनोवाल, हेमंता सरमा आणि टाटा ट्रस्टचे आभार मानतो, असं मोदी म्हणाले.

आरोग्याची सप्तऋषी

पंतप्रधान पुढे म्हणाले की आमच्या सरकारने सात गोष्टींवर, आरोग्याच्या सप्तऋषींवर फोकस केलं आहे.

  1. पहिला प्रयत्न हा की आजार होऊच नये. त्यासाठी आमच्या सरकारने प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरवर भर दिलाय. योग, फिटनेसशी संबंधित कार्यक्रम त्यासाठीच सुरु आहेत.
  2. दुसरा, जर आजार झाला तर तो सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात यावा. त्यासाठी देशभरात लाखो टेस्टिंग सेटर उभारले जात आहेत.
  3. तिसरा फोकस हा की लोकांना घराजवळच प्राथमिक उपचार आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात. त्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटरचा दर्जा सुधारला जात आहे.
  4. चौथा प्रयत्न हा आहे की गरिबांना चांगल्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावा. त्यासाठी आयुष्मान भारत सारख्या योजने अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज भारत सरकारकडून केला जाईल.
  5. पाचवा फोकस असा की चांगल्या उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज भासू नये. त्यासाठी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचं सरकार अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे.
  6. सहावा प्रयत्न हा की डॉक्टरांच्या संख्या वाढवली जावी. मागील 7 वर्षात MBBS आणि PG साठी 70 हजारापेक्षा अधिक नव्या जागा जोडल्या गेल्या आहेत. आमच्या सरकारने 5 लाखापेक्षा अधिक आयुष डॉक्टर्सनाही अॅलोपॅथीक डॉक्टरांच्या समकक्ष मानलं आहे.
  7. आमचा सातवा प्रयत्न आहे की आरोग्य सेवांचं डिजिटायझेशन. सरकारचा प्रयत्न आहे की उपचारासाठी लांब रांगेत रुग्णांना उभारण्याची गरज नसावी. उपचारांच्या नावे होणारी रुग्णांची अडचण दूर केली जावी. त्यासाठी एका पाठोपाठ एक योजना लागू करत आहोत.

इतर बातम्या :

Thane Crime : उल्हासनगरात पैशाच्या वादातून भररस्त्यात हाणामारी, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Petrol Diesel Price Hike : GST च्या परताव्याचा मुद्दा पुढे करून दिशाभूल, ठाकरे सरकारने अहंकार सोडल्यास 10 टक्क्यांनी पेट्रोलचे दर कमी-भाजप

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.