विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य, जाणून घ्या कसे तयार करायचे रेशन कार्ड?

रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक राज्याने एक खास वेबसाईट तयार केली आहे. आपण रहात असलेल्या राज्याच्या वेबसाईटवर जा आणि आपल्या रेशनकार्डसाठी अर्ज करा. (Ration card mandatory for free ration, know how to make a ration card)

विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य, जाणून घ्या कसे तयार करायचे रेशन कार्ड?
विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 4:18 PM

नवी दिल्ली : कोविड -19 महामारीमध्ये केंद्र सरकारकडून गरिबांना दिलासा देण्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना मे आणि जूनमध्ये मोफत रेशन देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. असे म्हटले जात आहे की, या घोषणेअंतर्गत गरिबांना 5 किलोपर्यंत रेशन फ्री मिळणार आहे. या निर्णयानंतर कोट्यावधी लोकांना याचा फायदा होईल असे बोलले जात आहे. (Ration card mandatory for free ration, know how to make a ration card)

प्रत्येक राज्यात एक वेबसाईट

सरकारच्या या घोषणेचा लाभ घेण्यासाठी प्रथम रेशन कार्ड असणे अनिवार्य अट आहे. आपल्याकडे रेशन कार्ड नसले तरीही आपण ते ऑनलाईन बनवू शकता. रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक राज्याने एक खास वेबसाईट तयार केली आहे. आपण रहात असलेल्या राज्याच्या वेबसाईटवर जा आणि आपल्या रेशनकार्डसाठी अर्ज करा. एखादी व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे तो रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केले जाते. परंतु जे 18 वर्षांपेक्षा जास्त आहेत ते स्वतःसाठी स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात.

असे करा रेशन कार्डसाठी अर्ज

सर्वप्रथम आपल्या राज्यच्या अधिकृत वेबसाईटवर जा. जसे आपण उत्तर प्रदेशते रहिवासी असाल तर आपण https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx वर क्लिक करुन फॉर्म डाउनलोड करु शकता. जर आपण बिहारचे रहिवासी असाल तर hindiyojana.in/apply-ration-card-bihar/ आणि महाराष्ट्रातील अर्जदार mahafood.gov.in पर क्लिक करुन अर्ज करु शकतात. यानंतर Apply online for ration card वर क्लिक करा.

आयडी पुराव्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

आयडी पुरावा म्हणून तुम्ही तुमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आरोग्य कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. याशिवाय शासनाने दिलेले कोणतेही कार्ड, हेल्थ कार्डदेखील देता येईल. याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेही पत्त्याचा पुरावा म्हणून देण्यात येतील.

किती आहे फी?

रेशन कार्ड बनविण्याकरीता फी 5 ते 45 रुपयांपर्यंत असते. अर्ज भरल्यानंतर फी जमा करा आणि त्यानंतर अन्य शुल्क जमा करा आणि आपले अर्ज सबमिट करा. फिल्ड पडताळणीनंतर जर आपला अर्ज योग्य असल्याचे आढळले तर आपले रेशन कार्ड तयार केले जाईल.

कुठे मिळेल रेशन कार्ड?

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जूनमध्ये देण्यात येणारी धान्ये त्याच रेशन दुकानातून मिळतील जिथून तुम्ही शिधा कार्डातून धान्य घेत आहात. जर तुमच्या रेशनकार्डमध्ये 4 लोकांची नावे नोंदवली गेली असतील तर प्रत्येकास 5-5 किलो म्हणजेच 20 किलो अन्नधान्य मिळेल.

आधार कार्ड अतिशय महत्वाचे

अलिकडेच एक जनहित याचिका (PIL) उघडकीस आली आहे की, देशातील विविध राज्यांत 3 कोटी शिधापत्रिका आधारशी जोडल्या गेलेल्या नाहीत. ही बाब सर्वोच्च न्यायालयातही गेली असून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला या विषयावर उत्तर देण्यासाठी समन्स बजावले आहे. अलिकडच्या वर्षांत, उपासमारमुळे होणाऱ्या अनेक मृत्यूच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्याचे एक कारण रेशन कार्ड आधारशी लिंक केलेले नसल्याचे सांगितले जातेय. (Ration card mandatory for free ration, know how to make a ration card)

इतर बातम्या

दमदार इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह Aprilia SXR 125 स्कूटर भारतात लाँच, किंमत…

गॅस सिलिंडरपासून बँकिंग व्यवहारापर्यंत 1 मेपासून 5 नियम बदलणार, पटापट वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.