Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डसारखं होणार!

केंद्र सरकारकडून जवळपास 84 कोटी नागरिकांना आता एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात बिहारमधून करण्यात आली आहे.

तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डसारखं होणार!
जास्त व्याज दर टाळा - क्रेडिट कार्ड तुम्हाला विनामूल्य क्रेडिट सुविधा पुरवते. पण तुम्ही जर हफ्ता चुकवला तर त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागतात. यामुळे महागडं पेमेंट टाळण्यासाठी, देय वेळेवर देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार्ड घेताना या बाबी लक्षात असूद्या.
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 8:23 AM

मुंबई: पिवळं, केशरी आणि पांढऱ्या रंगाचं तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डसारखं होणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजना आता नव्या वर्षात नव्या रुपात दिसणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून जवळपास 84 कोटी नागरिकांना आता एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात बिहारमधून करण्यात आली आहे.(ration card will change under the One Nation One Ration Card scheme)

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड आता देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्यांदा देशाला संबोधित करताना देशातील 80 कोटींपेक्षा अधिक गरीब लोकांना मोठा दिलासा दिला होता. पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू करण्याचा मुद्दाही उपस्थित केला होता.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’चे फायदे

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवरच धान्य मिळत आहे. तुम्ही ज्या राज्यात आहात, तिथे तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता. तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इतकच नाही तर तुम्ही स्वत:ही ऑनलाईन अर्ज करु शकता.

योजनेचा लाभ कसा मिळवाल?

तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करुनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणं गरजेचं आहे. त्यासह काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती तुम्हाला तहसील कार्यालयात अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या:

घरगुती सिलेंडरवर किती लाखांचा विमा मिळतो; कधी मिळते रक्कम?

SBI आणि भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा

ration card will change under the One Nation One Ration Card scheme

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.