Aashadhi ekadashi Pandharpur: ले चाय गरम.. रावसाहेब दानवेंनी भर पावसात वारकऱ्यांसाठी बनवला चहा

पंढरपूर, पंढरपूरमध्ये (Pandharpur) गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय. यामुळे वारकऱ्याच्या हातची टाळ मृदूंगाची जागा आता छत्री आणि रेनकोटने घेतली आहे. अशातच पंढरपूरमध्ये रावसाहेब दानवे (Ravsaheb Danwe) यांनी वारकऱ्यांसाठी भर पावसात चहा बनवलेला (Making tea) आहे. पंढरपुरातल्या एका छोट्याशा टपरी वरती रावसाहेब दानवे यांनी हातात पळी घेऊन चहा बनवला आणि वारकऱ्यांना चहाचं वाटप सुद्धा केलं. […]

Aashadhi ekadashi Pandharpur: ले चाय गरम.. रावसाहेब दानवेंनी भर पावसात वारकऱ्यांसाठी बनवला चहा
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 12:32 PM

पंढरपूर, पंढरपूरमध्ये (Pandharpur) गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय. यामुळे वारकऱ्याच्या हातची टाळ मृदूंगाची जागा आता छत्री आणि रेनकोटने घेतली आहे. अशातच पंढरपूरमध्ये रावसाहेब दानवे (Ravsaheb Danwe) यांनी वारकऱ्यांसाठी भर पावसात चहा बनवलेला (Making tea) आहे. पंढरपुरातल्या एका छोट्याशा टपरी वरती रावसाहेब दानवे यांनी हातात पळी घेऊन चहा बनवला आणि वारकऱ्यांना चहाचं वाटप सुद्धा केलं. रावसाहेब दानवे यांच्या गावातील वारकरीसुद्धा पंढरपूरला वारीसाठी आलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी आले असता रावसाहेब दानवे यांनी हा चहा बनवला. आषाढी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार, दि. 10 रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. तर राज्यभरातून आलेले भाविकदेखील लाखोंच्या संख्मेने दाखल झाले असल्याने मठ, मंदिरे, संस्थाने भाविकांनी फुलून गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

मंदिर परिसर दर्शन रांगेतही भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून येते. कोरोनानंतर प्रथम पायी पालखी दिंडी आषाढी सोहळा साजरा होत आहे.त्यामूळे गेल दोन वर्षे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला मुकलेले लाखो भाविक यात्रेला आले आहेत. भाविकांच्या उपस्थितीने पंढरपूरनगरी जबजली आहे.

दहा लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेले आहेत. मात्र, दिवसभर पाऊस सुरू असल्याने भाविकांची तारांबळ उडाली असून बहुतांश भाविकांनी बाहेर पडणे टाळले आहे. याचा परिणाम म्हणून यात्रा म्हणावी तशी भरलेली दिसून येत नाही. मात्र, पाऊस उघडत नसल्याने भर पावसातही भाविक रेनकोट, छत्री घेवून बाहेर पडताना दिसून येत आहेत. पाऊस सुरु असल्याने बहुतांश रस्त्यांवर गर्दी कमी दिसून येत आहे. याशिवाय एकनाथ शिंदे हे आपला पहिला मेळावा पंढरपूर येथे घेत असल्याने शिंदे समर्थकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.