‘केंद्र’ दहशतवाद्यांची पाळंमुळंही खोदून काढणार, ‘त्यांच्या’ बँक खात्यांचीही मिळणार माहिती…

केंद्राच्या हिटलिस्टवर असलेल्या 10 दहशतवाद्यांची बँक खात्यांची माहितीही आता सरकार मिळणार आहे.

'केंद्र' दहशतवाद्यांची पाळंमुळंही खोदून काढणार, 'त्यांच्या' बँक खात्यांचीही मिळणार माहिती...
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 8:34 PM

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी बँका आणि इतर वित्तीय संस्थांना या महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या 10 व्यक्तींच्या खात्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 ऑक्टोबर रोजी हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा) आणि इतर बंदी घातलेल्या संघटनांच्या एकूण 10 सदस्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यांच्याबाबत आता केंद्राकडून थेट कारवाई करण्यात येणार आहे.

केंद्राकडून आता दहशतवाद्यांविरोधात कडक पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे घोषित केलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानचा हबीबुल्ला मलिक उर्फ ​​साजिद जट्ट, बासित अहमद रेशी (रा. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि सध्या पाकिस्तानात), इम्तियाज अहमद कांडू उर्फ ​​सज्जाद (रा. जम्मू-काश्मीरमधील सोपोर) यांचा समावेश आहे.

सध्या पाकिस्तानात), जफर इकबाल उर्फ ​​सलीम (रा. पूंछ आणि सध्या पाकिस्तानात) आणि शेख जमील-उर-रहमान उर्फ ​​शेख साहब (रा. पुलवामा) यांच्याबाबतीत सरकारकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरबीआयने जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, नियमन केलेल्या युनिट्सना (आरई) केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या वरील सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्रिय बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था (एक्झिम बँक, नाबार्ड यासारख्या संस्थांचा समावेश आहे. .

रॉयटर्सच्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँक 3 नोव्हेंबर रोजी चलनविषयक धोरणांबाबत अतिरिक्त बैठक घेण्यात येणार आहे. किंबहुना, या बैठकीत महागाई नियंत्रणात न येण्याच्या कारणांवर चर्चाही केली जाणार आहे. या बैठकीतील माहिती सरकारलाही देण्यात येणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.