Narendra Modi : रविवारी मोदींच्या रॅलीपासून हाकेच्या अंतरावर स्फोट, स्फोटात RDXचा वापर! यंत्रणा अलर्टवर

Jammu Kashmir Blast RDX : रविवारी मोदींची सभा जिथं झाली, त्या सभेपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा स्फोट झाल्यानं चिंता व्यक्त केली जात होती.

Narendra Modi : रविवारी मोदींच्या रॅलीपासून हाकेच्या अंतरावर स्फोट, स्फोटात RDXचा वापर! यंत्रणा अलर्टवर
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 2:09 PM

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभास्थळापासून अवघ्या काही अंतरावर एक स्फोट (Blast in Jammu) झाला. या स्फोटात आरडीएक्स (RDX) आणि नायट्रेट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी हा स्फोट झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ खबरदारी घेत या घटनेची नोंद घेतली होती. रविवारी मोदींची सभा जिथं झाली, त्या सभेपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा स्फोट झाल्यानं चिंता व्यक्त केली जात होती. रविवारी मोदींची जम्मू काश्मीरमध्ये सभा झाली. त्याच वेळी मोदींच्या सभास्थळापासून बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ललिआना गावात हा स्फोट झाला. दरम्यान, हा स्फोट कोणत्याही अतिरेकी हल्ल्याचा किंवा कारवाईचा भाग नव्हता, अशी माहिती स्थानिक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दिली होती. मात्र आता याप्रकरणी आरडीएक्स आणि नायट्रेटचा अंश असल्याचं आढळून आल्यानं पोलिसही हादरुन गेले आहेत.

कसून चौकशी सुरु

जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून या स्फोटाप्रकरणी अधिक माहिती घेतली जाते आहे. तसंच संबंधित तपास यंत्रणाही आता याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. हा एका मोठ्या कटाचा भाग होता का, याबाबत आता चौकशी केली जाते आहे.

नेमका स्फोट कुठं झाला?

जम्मू काश्मीरच्या ललियाना गावातील एका शेतात ब्लॉस्ट झाल्याची घटना घडली होती. मोदींच्या दौऱ्यादरम्यानच ही घटना घडली होती. नरेंद्र मोदी यांच्या सभेचं जिथं आयोजन करण्यात आलं होतं, तिथपासून 12 किलोमीटर अंतरावर ललियाना गाव आहे. या गावातील शेतातमध्ये हा ब्लास्ट झाल्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता.

कशाचा तरी स्फोट झाला आहे, हे आवाज आल्यावर लक्षात येताच जम्मूतील यंत्रणा सतर्क झाली होती. त्यांनी तातडीनं या गावाच्या दिशेनं धाव घेतली होता. तेव्हा करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हा स्फोट कोणत्याही अतिरेकी कारवाईचा भाग नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र मोदींच्या सभास्थळापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर झालेल्या या स्फोटात चक्क आरडीएक्सचा वापर झाला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे नेमका हा सगळा प्रकार काय होता, यावरुनही शंका उपस्थित केली जाते आहे.

दौऱ्याआधी काही तास मोठी कारवाई

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठी कारवाई जवानांनी केली होती. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या शोधमोहिमेवाळी 24 तासांत जवळपास पाच अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. यात एक जवानही जखमी झाला होता. काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला म्हणून महत्त्व प्राप्त झालं होतं.

पाहा व्हिडीओ :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.