Aaditya Thackeray : रामलल्लाचं दर्शन, अयोध्येत महाराष्ट्र भवन ते राजकीय बात, आदित्य ठाकरेंच्या अयोध्येतल्या प्रेस कॉन्फरन्समधले 10 मोठे मुद्दे
Aaditya Thackeray : मी अयोध्येत चौथ्यांदा आलोय. येथील जनतेचा उत्साह कायम आहे. लोक उत्साहात आहेत. 2018मध्ये पहिल्यांदा आलो होतो. त्यावेळी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आलो होतो.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्येतल्या प्रेस कॉन्फरन्समधले 10 मोठे मुद्दे
Image Credit source: ani
Follow us on
अयोध्या: शिवसेना (shivsena) नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांचं लखनऊ विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आदित्य ठाकरे दुपारी अयोध्येला (Ayodhya Visit) पोहोचले. अयोध्येत गेल्यावर त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट देऊन महाप्रसादाचा अस्वाद घेतला. त्यानंतर ते पंचशील हॉटेलात गेले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राम मंदिरापासून ते महापालिका निवडणुकीपर्यंतच्या सर्व मुद्द्यावर त्यांनी उत्तरे दिली. पण प्रत्येकवेळी त्यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरे देण्याचं टाळलं. त्याऐवजी त्यांनी अयोध्ये दौऱ्याशी संबंधित प्रश्नांना उत्तर देणं अधिक पसंत केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आदित्य यांच्या पत्रकार परिषदेतील दहा मुद्दे
मी अयोध्येत चौथ्यांदा आलोय. येथील जनतेचा उत्साह कायम आहे. लोक उत्साहात आहेत. 2018मध्ये पहिल्यांदा आलो होतो. त्यावेळी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिर फिर सरकार ही घोषणा केली होती. त्यानंतर लगेच कोर्टाच्या प्रक्रियेला चालना मिळाली आणि कोर्टाचा निकाल लागला. त्यामुळे मंदिर तयार होत आहे. आम्ही कोर्टाचे आभार मानत आहोत.
आमची भेट ही तिर्थयात्रा आहे. हा राजकीय दौरा नाही. राजकारण करायला आलो नाही. दर्शन घ्यायला आलो आहे.
हे सुद्धा वाचा
अयोध्येत महाराष्ट्र सदन व्हावं ही आमची इच्छा आहे. 100 खोल्यांचं प्रशस्त महाराष्ट्र सदन करायचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलणार आहेत. तसेच त्यांना पत्रंही लिहिणार आहेत.
अयोध्या ही भारताच्या आस्थेशी जोडलेली पवित्र भूमी आहे. आम्ही सेवा भावनेने इथे आलो आहोत. इस्कॉनच्या मंदिरालाही भेट दिली. 70च्या दशकात इस्कॉन मुंबईला बाळासाहेबांनी मदत केली होती. त्यामुळे इस्कॉन ट्रस्टने मला बोलावलं. म्हणून भेट दिली.
शिवसेनेचं हिंदुत्व सर्वांना माहिती आहे. आमचं राजकारण आणि हिंदुत्व स्पष्ट आहे. रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाई पर वचन न जाई, असं आमचं हिंदुत्व आहे. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्व आहे. आम्ही राजकारणासाठी आलो नाही. दर्शनासाठी आलो आहोत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश नाकारला गेला. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा, मी इतर कोणाची काय भूमिका होती हे पाहणार नाही. माझं बृजभूषण सिंह यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. कोण कोणाचं स्वागत करतं, विरोध करतं यापेक्षा मंदिर निर्माण चांगलं व्हावं, महाराष्ट्र सदन व्हावं अशी आमची इच्छा आहे. जे स्वागत करतात त्यांना सोबत घेऊन विकास काम करू.
आम्ही भक्त म्हणून आलोय. राजकारण आणि निवडणुकांचा याच्याशी काही संबंध नाही. शक्ती भक्ती आमच्यासाठी दोन नाही एकच आहे. आमची भक्ती हीच शक्ती आहे. हाच आमचा धर्म आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. त्या पक्षाचं अंग झाल्या आहेत.
इथे प्रत्येक हृदयात शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकच भूमिका होती. मंदिर झालं पाहिजे. मतं मागण्यासाठी भूमिका घेतली नव्हती. शाखा या आमच्या समाजसेवेच्या आहेत. समाजसेवेची भावना घेऊन आम्ही आलो आहोत.
निवडणुका कोणत्याही असो आव्हान असतंच. मुंबई महापालिकेत रामलल्लाच्या आशीर्वादानं आमची सत्ता येईल.