Heavy Rain : मावसिनराममध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस, 24 तासांमध्ये 1003 मि.मी पावसाची नोंद
चेरापूंजी हे सर्वाधिक पावसासाठी ओळखले जात असले तरी यंदाचे चित्र काही वेगळेच आहे. गुरुवारी सकाळी 8:30 ते शुक्रवारी सकाळी 8:30 या दरम्यानच्या 24 तासांमध्ये चेरापूंजीला 972 मिमी पावसाची नोंद झाली तर मानसिनराममध्ये 1003.6 मिमी पाऊस बरसला आहे. मान्सूनचे देशात आगमन झाल्यापासून गेल्या 17 दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत 61.1 मिमी पाऊस झाला आहे.
गुवाहटी : महाराष्ट्राला अपेक्षित पावसाची प्रतिक्षा असली तरी आसाममधील मावसिनराममध्ये (Heavy Rain) मुसळधार पाऊस बरसला आहे. 24 तासांमध्ये या भागात तब्बल 1003.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 56 वर्षात वर्षात एकाच वेळी एवढा पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही दिवसांपासून आसाममध्ये (Rain) पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. चेरापूंजीमध्ये सर्वाधिक पाऊस होत असला तरी आतापर्यंतच्या पावसाच्या प्रमाणानुसार (Mawsynram) मावसिनरामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकीकडे महाराष्ट्रात पावसाविना खरिपातील पेरण्या रखडल्या असताना दुसरीकडे आसाममध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे.
सरासरीच्या तुलनेत 16 पट पाऊस
चेरापूंजी हे सर्वाधिक पावसासाठी ओळखले जात असले तरी यंदाचे चित्र काही वेगळेच आहे. गुरुवारी सकाळी 8:30 ते शुक्रवारी सकाळी 8:30 या दरम्यानच्या 24 तासांमध्ये चेरापूंजीला 972 मिमी पावसाची नोंद झाली तर मानसिनराममध्ये 1003.6 मिमी पाऊस बरसला आहे. मान्सूनचे देशात आगमन झाल्यापासून गेल्या 17 दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत 61.1 मिमी पाऊस झाला आहे. तसं पाहिला गेले तर मावसिनराम आणि चेरापूंजी ही ठिकाणे मेघालयाच्या पूर्व भागात असलेल्या खासी हिल्स जिल्ह्याच्या दक्षिण किनाऱ्यावर आहेत.हा भाग बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेचे अभिसरण वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे या दोन ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे. प्रमाणाच्या तुलनेत चेरापूंजी हे तीन नंबरवर असले तरी मावसिनरामला बरसलेला पाऊस हा लक्षवेधी ठरला आहे.
17 दिवसांमध्ये 230 मिमी पावसाची नोंद
चेरापूंजी आणि मावसिनराम या ठिकाणी झालेल्या पावसामुळे पूर्व आणि ईशान्य भाग पावसाच्या नोंदीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहचले आहेत. गेल्या 17 दिवसामध्ये या भागात 203.3 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा अतिरिक्त पाऊस पडणारा हा एकमेव भाग आहे. या ठिकाणच्या वायव्य भागात 63 टक्के, मध्य भारतामध्ये 57 टक्के तर दक्षिण द्वीपकल्पात 24 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
असा आहे चेरापूंजीच्या पावसाचा इतिहास
चेरापूंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आतापर्यंत पावसाच्या सरासरीचे अनेक विक्रम येथेच घडले आहेत. 16 जून 1995 या दिवशी या ठिकाणी 1563.3 मिमी पावसाची नोंद झाल्याचा अंदाज गुवाहटी प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. तर जागतिक हवामान संघटनेच्या मते सलग दोन दिवस सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रमही चेरापूंजीलाच झालेला आहे. 15 व 16 जून 1995 रोजी या ठिकाणी तब्बल 2 हजार 493 मिमी पावसाची नोंद झाली होती. मावसिनराममध्ये यापूर्वी 7 जून 1966 रोजी 24 तासांत 945.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 56 वर्षानंतर हा विक्रम मोडीत निघाला आहे.