मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांची बनारस हिंदू विद्यापीठात व्हिजिटिंग फॅकल्टी (visiting lecturer) म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा खोटी असल्याचे स्पष्टीकरण रिलायन्स उद्योगसमूहाकडून देण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला माहिती दिली. नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाकडून (BHU) असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा खुलासा त्यांनी केला. (BHU Students Oppose Proposal To Appoint Nita Ambani As Visiting Faculty)
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक नीता अंबानी यांची BHU मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. मात्र, बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला होता. BHU चे कुलगुरू राकेश भटनागर यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता.
Reports that Nita Ambani (in pic) will be a visiting lecturer at Banaras Hindu University (BHU) are fake. She hasn’t received an invitation from BHU: Reliance Industries Limited spokesperson to ANI pic.twitter.com/dd8MUpER8T
— ANI (@ANI) March 17, 2021
बनारस हिंदू विद्यापीठातील महिला अभ्यास केंद्रामध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी पदासाठीच्या तीन जागा रिक्त आहेत. या दोन पदांवर नीता अंबानी आणि उद्योगपती गौतम अदानींची पत्नी प्रिती अदानी यांचा विचार केला जात असल्याची माहिती आहे. तर तिसऱ्या पदावर इंग्लंडमधील उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची पत्नी उषा मित्तल यांचे नाव प्रस्तावित होते. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाने यासंदर्भात नीता अंबानी यांना पत्र पाठवल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता रिलायन्स उद्योगसमूहाने या वृत्ताचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.
महिला अभ्यास केंद्रामध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून नीता अंबानी यांची नियुक्ती हा चुकीचा पायंडा ठरेल. श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणं हे काही वैयक्तिक यश नव्हे. हे लोकं आपले आदर्श असू शकत नाहीत. या पदासाठी विद्यापीठ सक्षम महिलांचा विचार करत असेल तर तुम्ही अरुणीमा सिन्हा, भालचंद्री पाल, मेरी कोम आणि किरण बेदींसारख्या व्यक्तींचा विचार करायला पाहिजे, असे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले.
नीता अंबानी या महिला उद्योजिका आहेत. त्यांनी विद्यापीठात शिकवले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा पूर्वांचलमधील महिलांना मिळेल, असे मत BHU समिती समन्वयक निधी शर्मा यांनी व्यक्त केले होते.
इतर बातम्या:
नीता अंबानींकडून साईंच्या चरणी 1 कोटी 17 लाखांच्या वस्तू दान
गर्भावस्थेदरम्यान 30 किलोने वाढलेलं नीता अंबानींचं वजन, ‘या’ डाएट प्लॅननी झाल्या स्लिमट्रीम
कोट्यवधीचं मुखदर्शन! नीता अंबानींकडून सुनेला 300 कोटींचा हार
(BHU Students Oppose Proposal To Appoint Nita Ambani As Visiting Faculty)