2000 रुपयांची नोट बदलण्यापूर्वी जून महिन्यातील 12 दिवस लक्षात ठेवा, अन्यथा…

2000 Rupees Note : दोन हजार रुपयांची नोट घेण्यास आता टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बँकेत नोट बदलण्याशिवाय सर्वसामान्यांपुढे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता बँकेतील गर्दी आणि इतर कारणं पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.

2000 रुपयांची नोट बदलण्यापूर्वी जून महिन्यातील 12 दिवस लक्षात ठेवा, अन्यथा...
2000 रुपयांची नोट बदलण्यापूर्वी जून महिन्यातील 12 दिवस लक्षात ठेवा, अन्यथा...
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 5:15 PM

मुंबई : दोन हजार रुपयांची नोट आरबीआयने चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून पूर्णपणे बाद होणार आहे. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. कारण दोन हजार रुपये ही काय छोटी रक्कम आहे. त्यामुळे ठराविक वेळेत नोट बदलणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा जून महिन्यात बदलण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, जून महिन्यात बँक 12 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी 12 दिवस सोडून इतर दिवसांची निवड करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकेच्या सुट्ट्याची यादी जाहीर केली जाते. प्रत्येक राज्यांच्या सणासुदीनुसार बँकांना सुट्ट्या जाहीर केल्या जातात. या यादीनुसार जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. तुम्ही तुमच्या राज्यानुसार सुट्ट्या पाहून बँकेत जाण्याची तयारी करा.

जून महिन्यात या दिवशी बँका असतील बंद

  • 4 जून – रविवार असल्याने बँक बंद असेल.
  • 10 जून – महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँक बंद असेल.
  • 11 जून – रविवार असल्याने बँक बंद असेल.
  • 15 जून – रज संक्रांतीमुळे मिझोरम आणि ओडिशामध्ये बँक बंद असेल.
  • 18 जून – रविवार असल्याने बँक बंद असेल.
  • 20 जून – रथ यात्रा निघणार असल्याने ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँक बंद असेल.
  • 24 जून – चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहील.
  • 25 जून – रविवार असल्याने बँक बंद राहील.
  • 26 जून – खर्ची पूजा असल्याने त्रिपुरात बँक बंद राहील.
  • 28 जून – बकरी ईद असल्याने महाराष्ट्र, जम्मू कश्मिर आणि केरळमध्ये बँक बंद राहील.
  • 29 जून – ईद उल अजहामुळे देशातील काही राज्यात बँक बंद राहतील
  • 30 जून – रीमा ईद उल अजहामुळे मिझोरम आणि ओडिशातील बँक बंद राहतील.

तुम्ही बँकेत जाण्याचा प्लान केला असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर जाऊन यादी तपासा. प्रत्येक महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत येथे माहिती दिलेली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.