Currency : नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी नेताजींचा लावा फोटो, नव्या वाद्याला फुटले तोंड, कोणी केली मागणी..

Currency : भारतीय नोटांवरील महात्मा गांधी यांच्या फोटो हटवून त्याठिकाणी नेताजींचा फोटो लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

Currency : नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी नेताजींचा लावा फोटो, नव्या वाद्याला फुटले तोंड, कोणी केली मागणी..
नोटेवर हवे नेताजीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 9:58 PM

कोलकत्ता : भारतीय नोटांवरील(Indian Currency Notes) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो हटवून त्याठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांचा फोटो लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अखिल भारत हिंदू महासभेने (Akhil Bharat Hindu Mahasabha) याविषयीची मागणी करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महासभेने वादाचा बॉम्ब फोडला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ही स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे, मग त्यांचा फोटो भारतीय नोटांवर का नको, असा सवाल करत महासभेने याविषयीचा वाद उकरुन काढला आहे. महासभेचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची मागणी रेटली आहे.

या हिंदुत्ववादी संघटनेने यापूर्वी तर कहर केला आहे. दुर्गा पुजेच्या पेंडॉलमध्ये या संघटनेने महिषासूर हा गांधीजींची सारखा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुनही वाद झाला होता. कोलकत्त्यात हा प्रकार उघड झाला.

हे सुद्धा वाचा

पण यावरुन वादंग पेटल्यानंतर संघटनेने, आपला असा कोणताही हेतू नसल्याची सारवासारव संघटनेने केली होती. पण एकंदरतीच हा महिषासूर गांधींसारखा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पण संघटनेने विरोधक नाहकचं संघटनेला आणि गांधीजींना या वादात ओढत असल्याचा आरोप करत, वादातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही याप्रकरणात संघटनेवर तोंडसूख घेतले होते. महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा संदेश त्यांनी दिला होता.

पुढील वर्षी होणाऱ्या पालिकेच्या निवडणूका लढविणार असल्याचे या संघटनेने जाहीर केलेले आहे. ना भारतीय जनता पार्टी ना तृणमूल काँग्रेस, हे दोन्ही पक्ष हिंदूचे हितरक्षण करु शकत नसल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. आम्ही पश्चिम बंगाल मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा महासभेने केला आहे.

आता या संघटनेने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो नोटावर असण्यासाठी आग्रह धरला आहे. एवढ्यावर ठिक होते, पण गांधींजीच्या फोटोऐवजी नेताजींचा फोटो लावण्याची मागणी संघटनेने केल्याने वाद पेटला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.