सट्टेबाजी खेळायची सोडा…, फक्त जाहिरात दाखवूनच बघा…

सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचे प्रचारात्मक साहित्य आणि जाहिराती अजूनही काही डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहेत.

सट्टेबाजी खेळायची सोडा..., फक्त जाहिरात दाखवूनच बघा...
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 10:03 PM

नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून (Central Govrnment) आता अनेक नवीन नियम लावण्यात आले आहेत. गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी केंद्राने आता सट्टेबाजीच्या जाहिरातींबाबतही (advertisements) अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी सरकारने नवीन वेबसाइट्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेलना ऑनलाइन सट्टेबाजीच्या (Online betting) जाहिराती दाखवण्यावर बंदी घालण्यात आली असून या नियमांचे कोणी पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून या संदर्भात एक सूचना जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन जाहिरात करणाऱ्यांवर केंद्राकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचे प्रचारात्मक साहित्य आणि जाहिराती अजूनही काही डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहेत.

त्यामुळे केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ऑनलाइन ऑफशोर बेटिंग प्लॅटफॉर्मने डिजिटल मीडियावर सट्टेबाजीची जाहिरात करण्यासाठी बातम्यांच्या वेबसाइट्सचा समांतर वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

सट्टेबाजीच्या जाहिरातीबद्दल सांगण्यात आले आहे की, केंद्राने केलेल्या या सूचनांचे पालन केले गेले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील बहुतांश भागात बेटिंग आणि जुगार खेळला जात असून ऑनलाइन ऑफशोअर बेटिंग आणि जुगार प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत.

सट्टेबाजीबाबत फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या परिच्छेद 9 नुसार आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत बेटिंग आणि जुगारावर बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे आता केंद्र सरकारने कडक धोरण अवलंबून सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.