स्मृती दिन विशेष : क्रांतिकारक ते हिंदू संघटक सावरकर; जाणून घ्या वीर सावरकरांचा जीवन प्रवास

विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) अर्थात वीर सावरकर यांचा आज स्मृती दिन. विनायक दामोदर सावरकर हे खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तीमत्व होते. स्वातंत्र्यसैनिक (Freedom fighter), राजकारणी, समाजसुधारक, कवी व लेखक, हिंदू तत्त्वज्ञ ते भाषाशुद्धी व लिपिशुद्धी चळवळींचे प्रणेते अशा प्रत्येक क्षेत्रात सावरकरांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

स्मृती दिन विशेष : क्रांतिकारक ते हिंदू संघटक सावरकर; जाणून घ्या वीर सावरकरांचा जीवन प्रवास
वीर सावरकर
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 5:40 AM

विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) अर्थात वीर सावरकर यांचा आज स्मृती दिन. विनायक दामोदर सावरकर हे खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तीमत्व होते. स्वातंत्र्यसैनिक (Freedom fighter), राजकारणी, समाजसुधारक, कवी व लेखक, हिंदू तत्त्वज्ञ ते भाषाशुद्धी व लिपिशुद्धी चळवळींचे प्रणेते अशा प्रत्येक क्षेत्रात सावरकरांचे योगदान अनन्यसाधारण आहे. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील भगूर या गावी झाल्या. दामोदर सावरकर यांना तीन अपत्य होती. बाबाराव सावरकर हे थोरले, विनायक सावरकर हे मधले तर नारायणराव सावरकर हे धाकटे होते. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना याच्यावर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती पुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली होती. त्यानंतर सावरकरांनी स्वत:ला देश कार्यासाठी वाहून घेतले.

क्रांतिकारक सावरकर

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना या गुप्त संघटनेची प्रकट शाखा होती. पुढे संस्थेचा विस्तार वाढत गेला आणि तिचे रुपांतर अभिनव भारत संघटनेमध्ये झाले. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. 1905 साली विदेशी कापडांची होळी केली. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला रवाना झाले. देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या सावरकरांनी तेथे देखील आपले कार्य सुरूच ठेवले. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना म्हणजे स्वातंत्र्याचा बीजमंत्र वाटत असे. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क साधून, बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व 22 ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या तरुणाने केला.

हिंदू संघटक सावरकर

त्यानंतर सावरकरांना अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर त्यांची अंदमानाच्या काळकोठडीत रवानगी करण्यात आली. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले. त्यानंतर हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था जबाबदार आहे. हे ओळखून त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध केला. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील आपल्या वास्थव्यामध्ये समाजसुधारणेसाठी अनेक कार्य केली. त्यांनी जावळपास 500 मंदीरे अस्पृश्यांसाठी खुली केली. यावरूनच आपल्याला त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात येतो. अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे जीवन, असे  वीर सावरकरांच्या जीवनाचे दोन मुख्य भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप दिसते. तर दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे सावरक असे त्यांचे रुप दिसून येते. अशा या थोर क्रांतीकाराचा, साहित्यित्यिकाचा, हिंदू संघटकाचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबईत झाला.

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसनं भाकरी फिरवली, बीड जिल्हाध्यक्षपदावर राजेश्वर चव्हाण यांची निवड, इच्छुकांची प्रतिक्रिया काय?

मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपची मारहाण, अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला

अनिल देशमुखांना एक आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय, लाड करण्याचं कारण काय? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.