बीफवर ऋषी सुनक यांचे रोखठोक धोरण, ट्विटर हँडलवर कॉमेन्टचा पाऊस..
ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रचार करत होते. त्यावेळी त्यांनी एक ट्विट केले होते, ते आता पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे.
नवी दिल्लीः ब्रिटनचे नूतन पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची एक जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Old Post Viral) प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे ते गायीची पूजा करताना दिसून आले आहेत, तर दुसरीकडे मात्र ते ब्रिटनच्या बीफ इंडस्ट्रीला (Beef Industry) चालना देत असल्याची पोस्ट शेअर करतानाही दिसून आले आहेत. त्यामुळे नागरिक आता ऋषी सुनकर यांना अनेक सवाल उपस्थित करत आहेत. तर एका बाजूनी त्यांचे कौतुकही करण्यात येत आहे. कारण त्यानी लोकांच्या खाण्याच्या आवडीनिवडीचे स्वातंत्र्यही सांगितले आहे.
My constituency is home to hundreds of beef and lamb farmers and I am committed to supporting the fantastic industry they represent.
People’s food choices are their own. I would lead a government that champions our livestock farmers at home and abroad.https://t.co/ThHbAbhxz0 pic.twitter.com/rZ4ngtwCEB
— Rishi Sunak (@RishiSunak) July 30, 2022
ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रचार करत होते. त्यावेळी त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, जर त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली तर ते स्थानिक मांस उद्योगाला चालना देणार आहेत.
बीफ़ और लैंब इंडस्ट्री का सपोर्ट क्यों कर दिया महाराज? आपको पता है कि भारत में कितने लोगों का दिल टूट जाएगा आपका ये बयान पढ़कर। ब्रिटेन में बीफ़ मतलब तो बीफ़ ही होता है। https://t.co/7obQ4vwQ5u
— Dilip Mandal (@Profdilipmandal) October 24, 2022
गोमांस आणि मटण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण काम करु आणि त्याला चालना देऊ असंही त्यांनी म्हटले होते. याच विषयावर त्यांनी टेलिग्राफलाही मुलाखत दिली होती, तीही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऋषी सुनक यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची विक्री थांबवण्याचे आश्वासन दिले होते. तर ब्रिटनमधील शेतीयोग्य जमीन कुठेही कमी पडू देणार नाहीत असंही ते म्हणाले होते.
हिंदू धर्माला मानत असलेले ऋषी सुनक हे स्वतः गोमांस खात नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. पण देशभरात ‘लोकल फूड’ खरेदी करण्यासाठी मोहीम राबवणार, डाऊनिंग स्ट्रीटवर वार्षिक ‘फूड सिक्युरिटी समिट’ही आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
त्यावेळी मात्र कार्यक्रमादरम्यान स्थानिक मांस खाण्याचे फायदे सांगितले जाणार असल्याची चर्चाही आता आहे.