यदुवंश पेटला..सर्व यादव एकाच मंचावर..नितीश यांच्या मनात नेमकं चालंल तरी काय..

नितीश कुमार बिहार सोडून आता दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यामुळे भाजपचे खरे विरोधक हे नितीशी कुमारच असतील असंही आता बोललं जात आहे.

यदुवंश पेटला..सर्व यादव एकाच मंचावर..नितीश यांच्या मनात नेमकं चालंल तरी काय..
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 12:58 PM

नवी दिल्लीः विरोधकांची मोट बांधण्यासाठी नितीश कुमारांनी (Nitish Kumar) दिल्ली वारीत अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. विरोधकांच्या विश्वासावरच बिहारच्या राजकारणात आता नितीश कुमार आणखी एक मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत.  लालू प्रसाद यादवांचा (Lalu Prasad Yadav) आरजेडी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचे विलिनीकरणाची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. बिहारच्या या सगळ्या राजकारणात नितीश कुमार प्रमुखाच्या भूमिकेत असणार आहेत. बिहारमध्ये तेजस्वी यादवांकडे राज्याची सूत्र देण्याचीही तयारी झाली आहे.

त्यामुळे नितीश कुमार बिहार सोडून आता दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे भाजपचे विरोधक म्हणूनच आता नितीशी कुमार दिसतील असं सांगण्यात येत आहे.

बिहारमधील जेडीयू आणि आरजेडी हे दोन्ही पक्ष विलीन करुन देशातील एक मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची चिन्हं बिहारच्या राजकारणात दिसू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील एक मोठा पक्ष म्हणून हा प्रयोग होणार असल्याचेही बोलले जात आहे.

बिहारमध्ये हा प्रयोग राबवून नितीश कुमारांना आता राजकारणातील एक शेवटचा प्रयोग म्हणून ते दिल्लीच्या राजकारणात पाय रोवून उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहेत.

जास्तीत जास्त विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची नितीशकुमार यांची योजना आहे, त्यामुळे लालूप्रसाद आणि नितीशकुमार सोनिया गांधीं यांची भेट घेण्यासाठीही एकत्र येत आहेत.

बिहारच्या बदलत्या राजकारणानुसार नितीश कुमार भाजपविरोधात आघाडी करून देशभरात भाजपविरोधात जोरदार प्रचार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दिल्लीच्या राजकारणासाठी नितीश कुमारांनी बिहारची गादी सोडण्यासही सहमत आहेत.

नितीश कुमारांच्या राजकीय गणितानुसार विरोधकांची मोट बांधणे ही त्यांच्या राजकारणाची पहिली अट आहे, तर दुसरी अट ही की देशात भाजपविरोधात प्रचार करणे या गोष्टीला ते प्राधान्य देणार आहेत. तर या प्रयोगामुळे आता शरद यादवही पाटण्याच्या राजकारणात सक्रिय दिसू लागले आहेत.

लालू प्रसाद यांच्यासह शरद यादवही बुधवारी झालेल्या पाटण्यातील सभेत एकाच मंचावर दिसून आले. कारण होतं 2024 मध्ये भाजपला हरवण्यासाठी त्यांनी आपला आवाज बुलंज करायचा प्रयत्न करत आहेत.

लालू प्रसाद सध्या आजारी असूनही सक्रिय दिसत आहेत, कारण राजकारणात त्यांचा मुलगा तेजस्वी यादवांचेही राजकीय कारकीर्द घडवायची आहे.

या मोहिमेत लालूंना यशस्वी झाले असून तेजस्वी यादव मुख्यमंत्री झालेच तर ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोठी असणार आहे.

या राजकीय घडामोडीनंतर मात्र राजदचे दिग्गज नेते शिवानंद तिवारीही तेजस्वी यादव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याची भाषा करु लागले आहेत.

बिहारच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तेजस्वी यादवांकडे देऊन नितीश कुमारांना दिल्लीच्या राजकारणावर कबजा मिळवायचा आहे.

त्यामुळे 21 सप्टेंबर रोजीही लालू प्रसाद, शरद यादव आणि तेजस्वी यादवांनी एकाच वेळी भाजपविरोधी प्रचारमोहीमेत जोरदार हल्लाबोल चढवला तर दुसरीकडे सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचेही जाहीररित्या त्यांनी सांगितले. या सर्व घडामोडीत मात्र काँग्रेसचीही भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.

लालू प्रसाद यांचे गांधी घराण्याशी संबंध सुरुवातीपासून चांगले आहेत आणि काँग्रेसच्या वाईट काळातही लालूप्रसाद काँग्रेससोबतच राहिले होते.

त्यामुळेच लालू प्रसाद आणि नितीशकुमार यांची सोनिया गांधींसोबतची बैठकही नियोजनानुसारच होणार असल्याचे बोलले जात आहे.

विलीनीकरणाचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत पक्ष म्हणून दिसण्याचा मानस आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर बिहारच्या राजकारणात काही नवे प्रयोग काही महिन्यांत पाहायला मिळणार असून, त्यात तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेस आणि डाव्यांना एकत्र करुन महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांचाही पाठिंबा राष्ट्रीय पातळीवर मिळवता येईल असाही विचार केला जात आहे.

त्याचबरोबर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, यूपीमध्ये समाजवादी पक्ष आणि बसपा यांना एकत्र आणण्याची कसरतही केली जाऊ शकते असंही बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.