नवी दिल्ली : दिल्लीत (delhi rain) मागच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. काही सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे दिल्लीत काही ठिकाणचा रस्ता महापूरातून वाहून गेला आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात (delhi accident) होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत परिस्थिती नॉर्मल होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर फिरण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे. इंडिया गेटजवळ (india gate) रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळं पोलिसांनी तिथं बॅरिकेट लावल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
दिल्लीत मागच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, काही गाड्या पाण्यामुळं खराब झाल्या आहेत. तर काही गाड्या पाण्यातून वाहून गेल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटजवळ रस्ता खचला रस्ता खचला असल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. “शेरशाह रोड वळणाजवळ रस्ता खचल्याने सी-हेक्सागन इंडिया गेटवर वाहतुकीवर परिणाम झाला असल्यामुळं या रस्त्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.
सध्या दिल्लीत तापमान 24.4 डिग्री सेल्सियस इतकं आहे. दिल्लीत शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी झाली आहे. दोन दिवसातल्या पावसाने ४१ वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. रविवारी सकाळपासून सोमवार सकाळ पर्यंत 107 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
दिल्लीत सगळ्या पक्ष्यांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, ही टीका करण्याची वेळ नाही असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. मागच्या कित्येक तासांपासून काम करीत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर दिल्लीची यंत्रणा इतक्या मोठ्या पावसासाठी तयार नाही. परंतु आम्ही परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.