BH सीरीज असलेली वाहन स्वस्त की महाग? किती भरावा लागतो रोड टॅक्स
तुम्ही रस्त्यांवर BH नंबर असलेली बरीच वाहने पाहिली असतील. BH क्रमांकाची वाहने तुम्ही भारतात कुठेही नेऊ शकता. BH क्रमांक असलेल्या वाहनाचे नोंदणी शुल्क सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनाच्या नोंदणी शुल्कापेक्षा जास्त आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर जाणून घ्या.
तुम्ही रस्त्यांवर BH नंबर असलेली बरीच वाहने पाहिली असतील. BH क्रमांकाची वाहने तुम्ही भारतात कुठेही नेऊ शकता. BH क्रमांक असलेल्या वाहनाचे नोंदणी शुल्क सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनाच्या नोंदणी शुल्कापेक्षा जास्त आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर जाणून घ्या.
भारतात BH नंबरची नेम प्लेट उपलब्ध आहे. रस्त्यावर धावणाऱ्या अनेक वाहनांमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, ही नंबर प्लेट नेमकी कुणाला मिळते, यासाठी पात्रता काय आहे, BH क्रमांक असलेल्या वाहनाचे नोंदणी शुल्क सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनाच्या नोंदणी शुल्कापेक्षा जास्त आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
रस्त्यावर धावणाऱ्या अनेक वाहनांच्या नंबर प्लेट तुमच्या लक्षात आल्या असतील. वाहनांची नंबर प्लेट ज्या राज्यात वाहनाची नोंदणी केली जाते त्या अंकांपासून सुरू होते. म्हणजे जर एखाद्या वाहनाची मध्य प्रदेशात नोंदणी झाली असेल तर त्याचा प्रारंभिक डिजिटल MP असेल, जर त्याच वाहनाची उत्तराखंडमध्ये नोंदणी झाली असेल तर ती UK पासून सुरू होईल. त्याचप्रमाणे ज्या राज्यातून वाहनाची नोंदणी केली जाते, त्याचे पहिले दोन आकडे त्याच्या नंबर प्लेटवर दिसतात. हे तर तुम्हाला माहितीच आहे.
आता प्रश्न हा आहे की, बीएच क्रमांक असलेल्या वाहनाचे नोंदणी शुल्क सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनाच्या नोंदणी शुल्कापेक्षा जास्त आहे का? याविषयी खाली सविस्तर जाणून घ्या.
बीएच नंबर प्लेट नोंदणी शुल्क किती?
एका राज्यात सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनाची नोंदणी केली जाते. आणि जेव्हा तुम्ही ती गाडी दुसऱ्या राज्यात घेऊन जाता. म्हणजे समजा तुम्ही दिल्लीत राहता आणि तुमची कार दिल्लीत रजिस्टर्ड करून उत्तर प्रदेशात शिफ्ट होत आहात. त्यामुळे यूपीमध्ये पुन्हा नोंदणी करावी लागेल. पण त्याचवेळी जर तुम्ही बीएच क्रमांकाचे वाहन वापरत असाल तर. मग तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गाडी नेण्यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
बीएच नंबर प्लेटला किती रोड टॅक्स?
सामान्य नंबर प्लेट आणि बीएच नंबर प्लेटच्या नोंदणी प्रक्रियेत थोडा फरक आहे. बीएच नंबर प्लेटवर दर 2 वर्षांनी रोड टॅक्स आकारला जातो. यामध्ये तुमचे वाहन 10 लाख रुपयांपर्यंत असेल आणि पेट्रोल इंजिन असेल तर 8 टक्के भरावा लागतो. तर, वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाखांपर्यंत असेल तर 10 टक्के रक्कम भरावी लागते. जर कारची किंमत 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 12 टक्के टॅक्स भरावा लागेल. डिझेल कारवर 2 टक्के जादा कर भरावा लागतो. तर इलेक्ट्रिक वाहनांवर हेच २ टक्के कमी आहे.
सामान्य नंबर प्लेटला किती रोड टॅक्स?
दुसरीकडे नॉर्मल म्हणजेच सामान्य नंबर प्लेटबद्दल बोलायचे झाले तर जिथे दर दोन वर्षांनी ठराविक फॉर्म्युल्यावर बीएच नंबर प्लेटवर रोड टॅक्स घेतला जातो. तर सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनांना 15 वर्षांसाठी आगाऊ रोड टॅक्स भरावा लागतो. यामध्ये तुम्हाला 10 टक्के ते 15 टक्के रोड टॅक्स भरावा लागतो. त्यानुसार तुम्हाला बीएच नंबरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात. पण सामान्य नंबर प्लेटचा एकदा कर भरला की 15 वर्षे काळजी करण्याची गरज नाही. तर बीएच नंबरसाठी दर दोन वर्षांनी कर भरावा लागतो.
BH नंबर प्लेट कोणाला मिळते?
BH नंबर प्लेट निवडक लोकांनाच उपलब्ध आहे. यासाठी सर्व जण अर्ज करू शकत नाहीत. BH नंबर प्लेटसाठी केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कर्मचारीच अर्ज करू शकतात. याशिवाय संरक्षण क्षेत्रात काम करणारे कर्मचारीही यासाठी अर्ज करू शकतात.
बँक कर्मचाऱ्यांना BH नंबर प्लेटही मिळू शकते. प्रशासकीय सेवेतील कर्मचारीही यासाठी अर्ज करू शकतात. तर त्याचबरोबर चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारीही यासाठी अर्ज करू शकतात.