Kangna Ranaut : कंगना राणौत संसदेत बसायच्या लायकीची नाही… कोणी साधला निशाणा ?

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत सध्या अनेक त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा गदारोळ माजला. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी कंगनावर जोरदार हल्ला चढवला आहे.

Kangna Ranaut : कंगना राणौत संसदेत बसायच्या लायकीची नाही... कोणी साधला निशाणा ?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 8:42 AM

प्रसिद्ध अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत या सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांन शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बराच गदारोळ माजली, देशभरातून अनेक प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. त्यानंतर भाजपतर्फे त्यांना समजही देण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याचदरम्यान आता कंगना यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘ कंगना राणौत या संसदेच्या सदस्य (खासदार) बनण्याच्या लायकीच्या नाहीत. त्या फक्त स्वतःचा विचार करतात’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी केली. शेतकरी आंदोलनावरून कंगना यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रॉबर्ट वड्रा यांनी हे टीकास्त्र सोडलं. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाला एकत्र यावे लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचे आता काय पडसाद उमटतात त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

रॉबर्ट वड्रा यांचे टीकास्त्र

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांचे साठी शुक्रवारी हैदराबाद येथे आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘ कंगना राणौत या एक स्त्री आहेत, मी त्यांचा आदर करतो. पण त्या संसदेत बसण्याच्या लायकीच्या आहेत, असं मला वाटत नाही’ असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘ त्या (कंगना) शिक्षित नाहीत. मला असं वाटतं की त्या (इतर) लोकांबाबत विचार करत नाहीत. त्या फक्त फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांनी महिलांचा विचार करायला हवा. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाने एकत्र पुढे आले पाहिजे ‘ असे माझे आवाहन आहे. ‘ महिलांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून तो सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे’ असे मतही रॉबर्ट वड्रा यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाल्या होत्या कंगना राणावत ?

“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. “शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असं कंगना यांनी म्हटलं होतं.

यानंतर भाजपने भूमिका जाहीर केली. कंगना राणावत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपने ही भूमिका जाहीर केली.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.