PFI च्या टोर्गेटवर कोण होतं? महाराष्ट्र ATS चा धक्कादायक खुलासा
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते PFI च्या निशाण्यावर होते. RSS च्या दसरा रॅलीबाबतही यांनी माहिती गोळा केली होती.
नवी दिल्ली : देशभरातील विविध राज्यांत पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने छापेमारी केली. ही कारवाई करत मोदी सरकारने पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात थेट सर्जिकल स्ट्राईक केले आहे. या कारवाईत कागपत्रे हस्तगत करत 106 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. या चौकशीबाबत महाराष्ट्र ATS ने धक्कादायक खुलासा केला आहे.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(RSS) संबंधित अनेक बडे नेते PFI च्या टोर्गेटवर होते. या संबधीत लोकांबात PFI ने महत्त्वाची माहिती गोळा केली होती. या माहितीच्या आधारे मोठा कट आखण्याची यांची योजना होती अशी माहिती महाराष्ट्र ATSच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
ईडी आणि एनआयएने देशातील केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसामसह 11 राज्यांत छापे टाकले. कारवाईअंतर्गत 106 संशयित ताब्यात घेतले. यासाठी 10 राज्यांच्या पोलिसांची मदत देखील घेण्यात आली होती.
पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ओएमएस सलाम आणि दिल्लीचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना एनआयएने अटक केली होती.
महाराष्ट्र ATSच्या सुत्रांनी या कारवाईबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते PFI च्या निशाण्यावर होते. RSS च्या दसरा रॅलीबाबतही यांनी माहिती गोळा केली होती. मोठा कट यांनी आखला होता.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईनंतर आकांड तांडव करत केरळमध्ये बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागले होते. तोडफोड करत तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोपही केला जात आहे.
स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) वर बंदी घालण्यात आली. यानंतर PFI संघटना कार्यरत झाली. अल्पसंख्याक, दलित आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी ही संघटना कार्यरत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या संघटनेत सामील होणाऱ्या सदस्यांची नोंद ठेवली जात नाही. यामुळे संघटनेशी संबधीत लोकांचा शोध घेणे तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे.