संघाला अनुकूल वातावरण असल्याने अधिक सर्तक राहाण्याची गरज, सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला
हे भव्य कार्यालय आपल्याला काम करण्याची प्रेरणा देते, परंतु त्यातील वातावरणाची काळजी घेणे हे प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे असे यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

देशामध्ये संघाचे कार्य वेगाने सुरु आहे. अधिक व्यापक होत आहे. आज ज्या पुनर्विकसित इमारतीच्या प्रवेशोत्सव आहे. त्याच्या भव्यते अनुरुपच आपल्या संघाचे कामाचे स्वरुप भव्य करायचे आहे. आमच्या कामातून त्याची अनुभूती मिळाली पाहीजे. हे कार्य सर्व जगापर्यंत पोहचेल आणि भारताला विश्वगुरुच्या पदावर विराजमान करेल असा मला विश्वास आहे. आणि आम्ही याच देहाने, याच डोळ्याने या महान कार्यास होताना पाहू असा विश्वासही आहे. परंतू संघाच्या कार्यकर्त्यांना पुरुषार्थ दाखवावा लागेल. आम्हाला यासाठी सातत्याने आपल्या कार्याचा विस्तार करावा लागेल. झंडेवालान येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘केशव कुंज’ या इमारतीच्या प्रवेश कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयं संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विचार मांडले.
ते पुढे म्हणाले की आज संघाचे काम विविध माध्यमांतून विस्तारत चालले आहे. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की संघाच्या स्वयंसेवकाच्या व्यवहारात सामर्थ्य साधन शुचिता कायम राहायला हवी. मोहन भागवत म्हणाले की आज संघाने देशाची दशा बदलली आहे,परंतू दिशा बदलायला नको. समृद्धीची आवश्यकता असते. पण जेवढे आवश्यक आहे तेवढीच संपत्ती देखील असावी, सर्व मर्यादेत हवे. श्री केशव स्मारक समितीची ही पुनर्निर्मित इमारत भव्य दिव्य आहे. या इमारतीच्या भव्यतेसारखेच कार्य उभे करावे लागेल असेही संरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले.
राजधानीत कार्यालयाची गरज होती
यावेळी संघाच्या प्रगतीचा आढावा घेताना संघाच्या सुरुवातीपासूनच्या काळाला उजाळा देताना अनेक कठीण प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. नागपूरात आधी संघाचे कार्यालय ‘महाल’ ची सुरुवात कशी झाली ते संघसंघचालकांनी यावेळी सांगितले. दिल्ली देशाची राजधानी असल्याने येथूनच सर्व देशाचा गाडा हाकला जातो.त्यामुळे येथे कार्यालयाची आवश्यकता निर्माण झाली. आणि त्या गरजेतूनच येथील कार्यालय उभारले गेले आहे. ते यावेळी म्हणाले की आज ही भव्य इमारत तयार झाल्याने स्वयंसेवकाचे काम संपलेले नाही. आम्हाला ध्यानात ठेवायला हवे की उपेक्षा आणि विरोध आपल्याला कायम सावध ठेवत असतो. परंतू आता अनुकूल वातावरण असल्याने अधिक सर्तक राहाण्याची गरज आहे असा सल्लाही संघ कार्यकर्त्यांनी भागवत यांनी दिला.




स्वयंसेवक महाराजांच्या तपस्वी मावळ्यांसारखे
आज श्री गुरुजी यांची जयंती आहे त्यामुळे हा दिवस पवित्र आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचीही जयंती आहे. शिवराय ही संघाची विचारशक्ती आहे असे श्रीराम जन्मभूमि न्यासाचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंददेव गिरी महाराजांनी यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की कांची कामकोटी पीठाचे तत्कालिन शंकराचार्य परमाचार्यांनी एकदा वरिष्ठ प्रचारकाला म्हटले होते की संघ प्रार्थने शिवाय मोठा कोणता मंत्र नाही. गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी ‘छावा’ या चित्रपटाचा उल्लेख करीत म्हटले की छत्रपतींनी असे मावळे तयार केले की जे थकत नव्हते. थांबत नव्हते. झुकत नव्हते आणि विकले जात नव्हते. संघाचे स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपस्वी मावळ्यांसारखे आहेत. आपण हिंदू भूमीचे पुत्र आहोत, संघ राष्ट्राच्या राष्ट्राच्या परंपरांना बळकटी देतो आणि राष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलतो.
संघाच्या कामाची व्याप्ती वाढतच आहे
संघाने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. याच्या मागे डॉक्टर साहेबांचा प्रखर संकल्प आहे. संघाने समाजाच्या प्रती समर्पित भावनेने काम केले आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गाने प्रगतीसाठी कार्य केल्याने संघाच्या कामाची व्याप्ती वाढतच चालली आहे असे उदासीन आश्रम दिल्लीचे प्रमुख संत राघावानंद जी महाराज यांनी आपल्या छोटेखाणी उपदेशात सांगितले.
‘केशव कुंज’ च्या निर्मितीचा इतिहास
‘केशव कुंज’ मुख्यालयाच्या पुनर्उभारणीच्या विविध टप्प्याची माहिती यावेळी श्री केशव स्मारक समितीचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी विस्ताराने दिली. ही उल्लेखनीय बाब आहे की दिल्लीत साल 1939 पासून संघाचे कार्य सुरु आहे.तेव्हा झंडेवालान येथेच याच जागेवर एक छोटीसी इमारत होती. ज्यात संघाच्या कार्यालयाचा काही भाग बनला होता. परंतू 1962 मध्ये जागेचा विस्तार करुन अन्य दालने तयार करण्यात आली.1969 मध्ये श्री केशव स्मारक समितीची स्थापना झाली होती. 80 दशकात त्यात आवश्यकतेनुरुप इमारतीचा विस्तार झाला. साल 2016 मध्ये श्री केशव स्मारक समितीने बांधलेल्या ‘केशव कुंज’ या तीन टॉवरच्या इमारतीची पायाभरणी पूज्य सरसंघचालकांनी विधिवत पूजा करून स्वतःच्या हातांनी केली होती. आणि आज ही इमारत आपल्या सर्वांसमोर तिच्या पुनर्रचित भव्य स्वरूपात उभी आहे.
कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात ज्यांनी या इमारतीच्या उभारणी पुर्ननिर्माणात योगदान दिले त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान केला गेला. या कार्यक्रमात व्यासपीठावर सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, उत्तर क्षेत्र संघचालक पवन जिंदाल, दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल उपस्थित होते. केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे पी नड्ढा, संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, अरुण कुमार, वरिष्ठ प्रचारक सुरेश सोनी, संपर्क प्रमुख रामलाल, सह प्रचार प्रमुख नरेन्द्र ठाकुर, इंद्रेश कुमार, प्रेम गोयल, रामेश्वर यांच्या सह अनेक वरिष्ठ कार्यकर्ते, स्वयंसेवक उपस्थित होते.
कसे आहे नवीन पुर्नरचित केशव कुंज
केशव कुंजचे मुख्य तीन टॉवर आहेत : 1. साधना, 2. प्रेरणा, 3. अर्चना अशी त्यांची नावे आहेत. एक आकर्षक आणि आज काळातील सर्व सुविधांनी सुसज्ज असे अशोक सिंहल सभागृह आहे. सर्वसामान्यांसाठी एक केशव पुस्तकालय आहे, ओपीडी वैद्यकीय कक्ष आहे. साहित्य भंडारआहे, सुरुचीपूर्ण आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत पुस्तकांसाठी सुरुची प्रकाशन आहे. केशव कुंजच्या वीजपुरवठा होण्यासाठी 150 किलोवॅटचा सोलर प्लांट आहे, कचरा रीसाइकलिंग करुन त्यापासून उर्जा तयार करण्याकरीता 140 केएलडी क्षमतेचा एसटीपी प्लांट आहे. नव्या इमारतीही आधीच्या इमारती प्रमाणे एक सुंदर-दिव्य हनुमान मंदिर देखील आहे.