राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे तीन शब्द वर्ज्य; आरएसएसनं समाजाच्या डिक्शनरीतूनच वगळण्याचा दिला सल्ला
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने वडील गमावल्याचे फडणवीस यांनी येथे सांगितले आणि कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणींही यावेळी त्यांनी सांगितल्या.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी समाजाच्या डिक्शनरीतून ‘अनाथ’ आणि ‘अबला’ (असहाय्य स्त्री) हे शब्द काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. समाजातून या शब्दांचे अस्तित्व संपले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील ठाणे येथील पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने सामाजिक संस्थांना आवाहन केले की, समाजाच्या शब्दकोशातूनच ‘अनाथ’, ‘अबला’ आणि ‘उपेक्षित लोकं’ हे शब्द काढून टाकण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या देशातील कोट्यवधी लोकांच्या समाजात कोणी अनाथ कसे काय असू शकते असा सवालही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी उपस्थित केला.
विविध सामाजिक संस्थांचे काम पाहता ‘अनाथ’, ‘समर्थ’ आणि ‘उपेक्षित लोक’ या शब्दांना सध्याच्या जगात कोणतेही औचित्य राहणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या स्वयंसेवी संस्थेने स्थापन केलेल्या ‘अंत्योदय’ पुरस्काराने बेघर मुलांसाठी काम करणाऱ्या जीवन संघर्ष फाऊंडेशनचे सदाशिव चव्हाण यांचा संघ नेते जोशी यांनी गौरव केला.
राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या उभारणीत मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैय्याजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे कौतुक केले. हे रुग्णालय ‘डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था’ मार्फत चालवले जाते आहे.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने वडील गमावल्याचे फडणवीस यांनी येथे सांगितले आणि कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणींही यावेळी त्यांनी सांगितल्या.
ते म्हणाले की “मला वाटते की संघाच्या प्रेरणेमुळेच आपण सर्वांनी इतके चांगले रुग्णालय उभारू शकलो. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित होते.