Video: तर तुम्हाला देशाबाहेर जावं लागलं नसतं, देशातल्या मेडिकलच्या शिक्षणावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
पुढील दोन दिवसांत युक्रेनच्या शेजारील देशांमधून विशेष विमानांद्वारे 7,400 हून अधिक भारतीयांना परत आणले जाण्याची शक्यता आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गोफर्स्टची एकूण 17 उड्डाणे होतील अशी अपेक्षा आहे.
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी वाराणसी येथे युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांशी (Indian Students In Ukraine) संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी त्यांना आपले थरारक अनुभव सांगितले. हे विद्यार्थी वाराणसी तसेच उत्तर प्रदेशातील इतर भागातील होते. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत एअरलिफ्ट (Airlift) करत आहे आणि त्यांना मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत. 24 फेब्रुवारीच्या रशियन लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असल्याने भारत आपल्या नागरिकांना युक्रेनच्या शेजारील रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंड मार्गे विशेष विमानांद्वारे बाहेर काढत आहे. दोन भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनमध्ये मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृतदेह भारतात आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
तर युक्रेनला जावं लागलं नसतं-मोदी
आपल्या देशात पुरेशा जागा उपलब्ध असत्या तर विद्यार्थ्यांना युक्रेनला जावे लागले नसते, असे मत यावेळी मोदींनी व्यक्त केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गेल्या सत्तर वर्षात पुरेशी कॉलेज उपलब्ध झाले नसल्येच म्हटले आहे.
मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद
#WATCH | Prime Minister Narendra Modi interacted with students who returned from Ukraine in Varanasi today. These students shared their experiences with him. The students were from Varanasi as well as other parts of Uttar Pradesh. pic.twitter.com/DOSz8XYo5j
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 3, 2022
ऑपरेशन गंगा वेगवान
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मंगळवारी सांगितले की, सुमारे 8,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये गेले आहेत. हरदीप सिंग पुरी, हंगेरी, ज्योतिरादित्य सिंधिया, रोमानिया, किरेन रिजिजू, स्लोव्हाकिया आणि व्ही.के. सिंग पोलंडमध्ये आहेत. यांचा विद्यार्थ्यांशीत सतत संवाद सुरू असल्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे तसेच परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे काम ही मंडळी करत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, येत्या दोन दिवसांत युक्रेनच्या शेजारील देशांतून 7,400 हून अधिक भारतीयांना विशेष विमानांद्वारे परत आणले जाईल. भारतीय एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गोफर्स्टमधून एकूण 17 उड्डाणे होतील. शुक्रवारी 3,500 आणि शनिवारी 3,900 हून अधिक लोकांना भारतात परत आणले जाण्याची अपेक्षा आहे.
भारत सरकारचा प्लॅन काय?
सूत्रांच्या हवाल्याने गुरुवारी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की सरकारने या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांचीही नियुक्ती केली आहे. 10 मार्चपर्यंत अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एकूण 80 उड्डाणे सेवेत असतली. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि आयएएफ विमानांच्या ताफ्यातील आहेत. पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर महत्त्वाच्या बैठकांचे सत्र घेत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video
Russia Ukrane War : रशियाशी चर्चेला युक्रेनचा नकार, युद्धाची धग आणखी वाढणार