Russia Ukraine War : मोदींच्या उपस्थितीत सगळ दुसऱ्या दिवशी उच्चस्तरीय बैठक, युद्धस्थिती आणि विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत चर्चा होणार
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात होणारी ही चौथी उच्चस्तरीय बैठक आहे. आज होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी वॉर झोनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणणे आणि यूक्रेनमधील स्तितीवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
मुंबई : रशिया (Russia) आणि यूक्रेनमधील (Ukraine) भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक होणार आहे. सध्याची युद्धस्थिती आणि यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी परत आणण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात होणारी ही चौथी उच्चस्तरीय बैठक आहे. आज होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी वॉर झोनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणणे आणि यूक्रेनमधील स्तितीवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आपला उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यावेळी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याबाबत चर्चा झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत यूक्रेनच्या शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणि सहकार्य अजून वाढवण्याबाबत चर्चा झाली. जेणेकरुन या देशांमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यास मदत होऊ शकते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Prime Minister Narendra Modi to shortly chair another high-level meeting on Ukraine crisis: Govt Sources#RussiaUkraineCrisis
(File photo) pic.twitter.com/XutrnYhkl5
— ANI (@ANI) February 28, 2022
पंतप्रधान मोदी यांचा पुतिन आणि झेलेन्स्कींशी संवाद
रशिया आणि यूक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे आणि त्यात यूक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करुन हिंसा थांबवून चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर शनिवारी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदोमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी झेलेन्स्की यांनी रशियाचे हल्ले रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अर्थात यूएनएससीमध्ये भारताकडून समर्थनाची मागणी केली होती.
Prime Minister @narendramodi chairs a high level meeting on #Ukraine. The four ministers who will be going to the neighbouring countries of Ukraine for evacuation of the Indians stranded there are also present. pic.twitter.com/hQiNvseLpw
— Rakesh Mohan Chaturvedi (@_Rakesh_RC) February 28, 2022
रशियन न्युक्लिअर डिटेरन्स फोर्सला अलर्ट
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुनित यांनी रशियन न्युक्लिअर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर यात कुठलीही शंका नाही की ते दखल देतील आणि त्यांची हार होणार नाही. कोणताही देश आमच्यावर हल्ला करेल तर त्याला परिणान भोगावे लागतील, असा इशाराच पुतिन यांनी दिला होता. 1945 मधील दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा उपयोग केलेला नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्याचे परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहे. त्या हल्ल्यात 2 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
इतर बातम्या :