Russia Ukraine War : उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना, रशिया-यूक्रेन युद्धावर उच्चस्तरीय बैठक
रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. तर यूक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाने यूक्रेनच्या 471 सैनिकांना अटक केल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर यूक्रेनमधील 975 सैन्य तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आलाय.
नवी दिल्ली : रशिया यूक्रेनमध्ये भीषण युद्ध (Russia-Ukraine crisis) सुरु आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपल्या उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत दाखल होताच पंतप्रधान मोदी युद्धाच्या मुद्द्यावर उच्चस्तरिय बैठक घेणार आहेत. रशिया आणि यूक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य (Russian military) यूक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. तर यूक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाने यूक्रेनच्या 471 सैनिकांना अटक केल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर यूक्रेनमधील 975 सैन्य तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आलाय.
दुसरीकडे यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानेही मोठा दावा केलाय. युद्धात रशियाचे 4 हजार 300 सैनिक मारले गेल्याचा दावा यूक्रेनकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर 146 रणगाडे, 27 विमान आणि 26 हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचंही यूक्रेनकडून सांगण्यात आलंय.
Prime Minister Narendra Modi will hold a high-level meeting on the Ukraine issue.
(File Pic) pic.twitter.com/fMRSQCaOe7
— ANI (@ANI) February 27, 2022
पंतप्रधान मोदींच्या उत्तर प्रदेशात 3 रॅली
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आज उत्तर प्रदेशात 3 मोठ्या निवडणूक रॅली होत्या. बस्ती आणि देवरियामधील रॅली केल्यानंतर मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही रॅली केली. या रॅलीवेळी पंतप्रधान मोदींनी समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा साधला.
रशिया-युक्रेन वादाच्या भारताला संघर्षझळा
रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद सर्व पातळ्यांवर जाणवत आहे. खाद्यपदार्थांपासून पेट्रोल-डिझेलच्या विक्रमी भाववाढीचे संकेत दिले जात आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत. क्रूड तेलाचे भाव अद्यापही 100 डॉलर प्रति बॅरेलहून अधिकच आहे. आज (शुक्रवारी) ब्रेंट क्रूडचे भाव प्रति बॅरेल 101 डॉलरवर पोहोचले होते. भारतासारख्या क्रूड ऑईलच्या आयातप्रधान देशासाठी वाढते भाव चिंताजनक ठरू शकतात. क्रूड तेल आयात करण्यासाठी गंगाजळीवर मोठा भार येऊ शकतो आणि राजकोषीय तूटीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलसोबतच गॅस भाववाढीची झळ सहन करावी लागेल.
इतर बातम्या :