बाबा बालकनाथ होतील का राजस्थानचे योगी? भाजपचा काँग्रेसला दे धक्का

Assembly Election 2023 | राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला धोबीपछाड दिली. लवकरच भाजपचे सरकार अस्तित्वात येईल. मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चे बांधणीची चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्ये पण या 'योगी'ची चर्चा रंगली आहे. भाजपचे बाबा बालकनाथ हे मुख्यमंत्री पदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. कोण आहेत हे भगवा वस्त्रधारी महंत बालकनाथ?

बाबा बालकनाथ होतील का राजस्थानचे योगी? भाजपचा काँग्रेसला दे धक्का
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 2:48 PM

जयपूर | 3 डिसेंबर 2023 : राजस्थानमध्ये सत्ता बदलाची परंपरा कायम आहे. विधानसभा निकालातून भाजप जोरकसपणे सत्तेत येताना दिसत आहे. प्रदेशातील 199 विधानसभा मतदारसंघापैकी भाजप 109 जागांवर अग्रेसर आहे. तर काँग्रेस 71 जागी आघाडीवर आहे. 18 जागांवर इतर उमेदवारांनी प्रस्थापितांना पाणी पाजले आहे. निकाल अनुकूल दिसताच मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे. राजस्थान भगवामय झाल्याने उत्तर प्रदेशाप्रमाणेच राजस्थानमध्ये योगी सरकार येणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे बाबा बालकनाथ हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. सर्वेक्षणात सुद्धा त्यांची लोकप्रियता दिसून आली. त्यामुळे राजघराण्यातील नाही तर भगवे वस्त्रधारी संन्यासी राज्याचा कारभार हाकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण आहेत महंत बालकनाथ?

वसुंधरा राजे यांना खो?

भाजपने या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण हे गुलदस्त्यात ठेवले. पण राज्यातील निवडणुकीत वसुंधरा राजे यांनाच पुढे करण्यात येते. यंदा ही त्यांनाच मान देण्यात आला. भाजप आता बहुमताने सत्तेत येत असताना बाबा बालकनाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे यांना खो देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाबा बालकनाथ हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच नाथ संप्रदायातील आहेत. ते आक्रमक हिदुंत्वाचा चेहरा आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री बसण्याची दाट शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

या मतदार संघावर मजूबत पकड

अलवर जिल्ह्यातील तिजारा मतदार संघावर महंत बालकनाथ यांची मजबूत पकड आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर प्रचारापर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजर होते. यापूर्वी 2013 मध्ये मामन सिंह यादव यांनी या मतदारसंघातून भाजपसाठी विजय खेचून आणला होता. पण त्यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले. त्यांनी बंडखोरीचा विचार मांडला. पण बालकनाथ यांनी त्यांची समजूत काढली. आता महंत बालकनाथ यांचा विजय पक्का मानण्यात येत आहे.

संसदेत जबरदस्त एंट्री

हरियाणा ही योगी बालकनाथ यांची जन्मभूमी आहे. तर राजस्थान ही त्यांची कर्मभूमी आहे. 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. हा भाग मेवाड परिसर म्हणून ओळखल्या जातो. तो भाजपचा जूना गड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पण येथे मजबूत पकड आहे. या परिसरात योगी यांचा दरारा आहे.

एक्झिट पोलमध्ये बालकनाथ यांना पसंती

एक्झिट पोलमध्ये बाबा बालक नाथ यांना नागरिकांनी मोठी पसंती दिली. सध्या राजस्थानमध्ये वातावरण भगवामय झाले आहे. काँग्रेसपेक्षा भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपचे बहुमताचे सरकार राज्यात येणार असल्याने मुख्यमंत्री पदी बाबा बालकनाथ यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.