Lok Sabha Byelection Results 2022: पंजाबमध्ये केजरीवालांना धक्का, मुख्यमंत्री मान यांच्या लोकसभा जागेवर पराभव, शिरोमणी अकाली दल विजयी
भगवंत मान यांनी वर्षाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री होण्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. यावेळी विरोधी पक्ष मतदानाची टक्केवारी 2019 मधील 72.4 टक्के होती, त्यानंतर 23 जून रोजी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 45.3 टक्क्यापर्यंत कमी झाली होती.
नवी दिल्लीः पंजाबमधील संगरूर पोटनिवडणुकही (Sangrur Lok Sabha By-election) अशा काळातच जाहीर झाली, ज्यावेळी आम आदमी पक्षाच्या सरकामुळे (AAP) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या निवडणुकीवर विशेषत गायक आणि राजकारणी सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा प्रभाव दिसून आला. संगरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आप पक्षाने आपल्या मतांनी निकालाच्या दिशेने वाटचाल केली असली तरी आपच्या यशाचे स्वप्न मात्र येथे काही कालावधितच भंग झाल्याचे स्पष्ट झाले.
आपल्याच राज्यात ‘आप’ धक्का
राज्य विधानसभा निवडणुकीत धुरी येथून आमदार म्हणून निवडून आलेले मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर संगरूर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. शिरोमणी अकाली दल-अमृतसर (एसएडी-ए) चे (Shiromani Akali Dal-Amritsar (SAD-A)) उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांनी पंजाबमधील संगरूर पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे (आप) गुरमेल सिंग यांचा सुमारे 6,800 मतांनी पराभव करून विजय मिळविला आहे.
काही तासातच निकाल स्पष्ट
रविवारी सकाळी 8 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या मतमोजणीनंतर दुपारी 2 वाजता अंतिम निकाल जाहीर झाला. या वर्षी पोटनिवडणुकीमध्ये तीन लोकसभा आणि सात विधानसभा मतदारसंघांमध्ये संगरूर मतसंघाचा समावेश होता.
मतदानाची टक्केवारी घसरली
भगवंत मान यांनी वर्षाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री होण्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. यावेळी विरोधी पक्ष मतदानाची टक्केवारी 2019 मधील 72.4 टक्के होती, त्यानंतर 23 जून रोजी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 45.3 टक्क्यापर्यंत कमी झाली होती.
आप पराभवाच्या छायेखाली
पंजाबमध्ये ‘आप’साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मात्र या निवडणुकीत आपकडून सुरूवातीपासूनच सावधपणाची भूमिका घेण्यात आली होती. आपकडून ही निवडणूक पराभवाच्याच छायेखाली खर तर लढवली गेली होती, कारण गेल्या तीन महिन्यांच्या कारकीर्दीत मान सरकाराच्या नेतृत्वाखालील आलेले राज्य सरकार येथे अयशस्वी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर ही निवडणुकी शिरोमणी अकाली दलाचा पराभव झाला असता तर पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांची स्थिती आणखी वाईट झाली असती.
भाजपचाही धुव्वा
मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे धुरीचे माजी आमदार दलवीर सिंग गोल्डी यांच्या विरोधात ‘आप’ने पक्षाचे संगरूरसाठी गुरमेल सिंग यांचा उमेदवारी जाहीर केली होती, तर भाजपकडून बर्नालाचे माजी आमदार केवल ढिल्लन यांना उमेदवारी देण्यात आली होती, ते 4 जून रोजी पक्षात परत आले होते.
या निवडणुकीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या बलवंत सिंग राजोआना यांची बहीण कमलदीप कौर यांना एसएडीकडून उमेदवारी देण्यात आली होती.
मतमोजणी आणि निकाल
या निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे तर, शिरोमणी अकाली दलाचे अमृतसरचे उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांनी संगरूरमध्ये 6,800 मतांनी विजय मिळवला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत शिरोमणी अकाली दलातील अमृतसरचे सिमरनजीत सिंग मान स्पष्ट आघाडीवर होते, मात्र तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपच्या गुरमेल सिंग यांच्या विरोधात मान 6916 मतांनी आघाडीवर होते, त्यावेळी आता सुमारे 10,000 मतांची मोजणी बाकी होती. तर त्यानंतर मान गुरमेल सिंग यांच्या विरोधात 4843 मतांनी आघाडीवर होते.