Sania Mirza : सानिया मिर्झानं केली कमाल, देशातली पहिली मुस्लीम महिला फायटर पायलट बनणार

अवनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे यश सानिया मिर्झानं मिळवलंय. पहिल्यांदा सानियाला एनडीएत अपयश आलं होतं.

Sania Mirza : सानिया मिर्झानं केली कमाल, देशातली पहिली मुस्लीम महिला फायटर पायलट बनणार
सानिया मिर्झा
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 10:42 PM

नवी दिल्ली : सानिया मिर्झा (Sania Mirza) देशातली पहिली मुस्लीम महिला फायटर पायलट (first Muslim woman fighter pilot) बनणार आहे. तीनं एनडीए परीक्षेमध्ये (NDA exam) चांगली रँक मिळविली आहे. त्यामुळं आता तिला हा सन्मान मिळणार आहे. सानिया मिर्झा उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर येथील रहिवासी आहे. सानिया मिर्झाचे वडील टीव्ही मेकॅनिकल आहेत. आपल्या मुलीला त्यांनी शिकविलं. सानियानं मेहनत करून हे यश मिळवलं. एनडीए परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायूसेनेत प्रवेश घेणाराय. त्यामुळं सानिया आता देशातली पहिली मुस्लीम फायटर पायलट बनणार आहे.

सानिया मिर्झानं एनडीए परीक्षेत १४९ चा रँक मिळविला. सानियाचं दहावीपर्यंत शिक्षण गावातचं झालं. एनडीएतील यशानंतर ती आता २७ डिसेंबरला पुण्यात जाणार आहे. एनडीए २०२२ च्या परीक्षेत ४०० जागा होत्या. त्यापैकी दोन जागा या फायटर पायलटसाठी होत्या.

पहिली महिला फायटर अवनी चतुर्वेदी आहेत. अवनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे यश सानिया मिर्झानं मिळवलंय. पहिल्यांदा सानियाला एनडीएत अपयश आलं होतं. त्यामुळं तीनं दुसऱ्यांदा एनडीएची परीक्षा दिली.

या यशासाठी तिला बरेच प्रयत्न करावे लागले. घरची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. वडील टीव्ही मेकॅनिकल होते. त्यामुळं तिथपर्यंतची तिची झेप खूप मोठी मानली जाते. एनडीए ही कठीण परीक्षा असते. यात फारच कमी जणांना यश मिळते. विशेषतः त्यासाठी सैनिकी किंवा मिलीटरी शाळेत शिक्षण घेणारी मुलं निवडली जातात. पण, चांगले गुण असल्यास सामान्य विद्यार्थ्यांनाही येथे संधी मिळते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.