Sanjay Raut : शिंदे म्हणाले, मॅटनी शो बंद झाला, संजय राऊतांनी शोलेची आठवण करून दिली; राजकीय फिल्म कुठपर्यंत आली?

2014पासून पुढील संपूर्ण काळ कोण होतं भाजपाला उत्तर देण्यासाठी? महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब आणि शिवसेनेवरही हल्ले झाले, त्यावेळी यातील कितीजण होते हल्ले परतवून लावण्यासाठी, असे सवाल संजय राऊत यांनी केले.

Sanjay Raut : शिंदे म्हणाले, मॅटनी शो बंद झाला, संजय राऊतांनी शोलेची आठवण करून दिली; राजकीय फिल्म कुठपर्यंत आली?
बंडखोरांवर नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत निशाणा साधताना संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 8:04 PM

नवी दिल्ली : आज तुमच्याकडे आकडा आहे ना, तर तो आकडा लावा. मात्र भविष्यामध्ये 2014ला निवडणुका होणार आहेत. तेव्हा आकडा बदललेला असेल. त्यावेळेला मॅटिनी शोदेखील आमचा असेल आणि सिनेमाचे सर्व शोदेखील आमचे असतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या टिकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते दिल्लीत बोलत होते. ते म्हणाले, की आमचा मॅटिनी शो जरी असला तरी मॅटिनी शोला (Matinee show) दिवार आणि शोले 25 वर्ष चालला. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. आजही महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा हा मॅटिनीलाच चालतो, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला. उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडी करतानाही त्यांनी भाजपा आपली गळचेपी करत असल्याचंही आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं. ज्यांनी आपला अपमान केला, मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही, त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं, असं संजय राऊत म्हणाले.

‘भाजपानेच युती तोडली होती’

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे किंवा ठाकरे कुटुंबाचे संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चांगलेच आहेत. आता मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत ज्या कुणी गौप्यस्फोट केलाय. कदाचित त्यांना मोदींनीच सांगितलं असेल की आमच्या बैठकीत असं असं झालं होतं. 2014ला भाजपानं जेव्हा शिवसेनेसोबत युती तोडली तेव्हा यातील किती जणांनी प्रश्न विचारले होते? तेव्हा आमच्या मनात युती करावी हाच विचार होता. आज आम्हाला विचारतात युती का तोडली? आता कितीजण प्रश्न विचारत आहेत. युती तोडण्यास शिवसेना जबाबदार नाही, असे राऊत म्हणाले.

‘आता काय कोर्टातून अॅफिडेव्हिट करायचं का?’

2014पासून पुढील संपूर्ण काळ कोण होतं भाजपाला उत्तर देण्यासाठी? महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब आणि शिवसेनेवरही हल्ले झाले, त्यावेळी यातील कितीजण होते हल्ले परतवून लावण्यासाठी? एनडीएतून आम्ही बाहेर पडलो हे आम्ही आधीच स्पष्ट केलंय. आता काय कोर्टातून अॅफिडेव्हिट करायचं आहे का? ते काहीही बोलतील. आम्ही एनडीएतही नाही आणि यूपीएतही नाही, असे राऊत म्हणाले. शिवसेना भाजपा युतीचा शब्द पाळला गेला असता तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण भाजपानं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपानेच केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची जेव्हा बैठक व्हायची तेव्हा ते एकनाथ शिंदे हेच आपले मुख्यमंत्री असतील असं सांगत होते.

हे सुद्धा वाचा

‘प्रश्न उपस्थित करणं मुळातच चुकीचं’

माझ्यावर किंवा विनायक राऊत यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करणं मुळातच चुकीचं आहे. प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहे. प्रलोभनावर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करून दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो. वाईट काळात आम्ही पक्षासोबत आहोत, आमची निष्ठा पक्षासोबत आहे. आजही ते तांत्रिक दृष्या शिवसेनेचे खासदार आहेत. एकाच पक्षात आहोत. इथेच आमच्या जेवणावळी उठल्या आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. आम्ही त्यांनी निवडणुकीत उत्तर देऊ, असे ते म्हणाले. रामदास कदम यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.

बंडखोरांवर निशाणा साधताना काय म्हणाले संजय राऊत?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.