टेस्ट ट्यूब बेबी मांडीवर घेऊन बसलात, फडणवीस यांच्यासहित शिंदे यांना संजय राऊत यांनी डिवचलं, काय म्हणाले राऊत…
तुम्ही विश्वास घात केल्यामुळे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसले, शिवसेनेला अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद देण्याचे आपण मान्य केलं होतं. देवेंद्र यांचं वक्तव्य उपलब्ध आहे ते पहा व स्वता तिथे स्वतः काय बोलले असंही राऊत म्हणाले.
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामध्ये संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गटाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मांडीवर घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीला परवानगी दिली असती तर सरकार कोसळलं नसतं, ते सरकार टिकलं असतं असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे मला दहावं आश्चर्य वाटतात. जगात आठ आश्चर्य आहेत, त्यानंतर नववे आश्चर्य हे दिल्लीत बसले आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
शरद पवारांशी बोलून पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच ते सरकार चाललं असतं सरकार कोसळले नसते. देवेंद्र फडणीस हे काय बोलत आहे मी त्यांचे वक्तव्य पाहतो आहे. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या जगातलं दावा आश्चर्य आहे. आधीचे आठ आहेत, दोन दिल्लीत आहे आणि हे दहावे आहेत.
तुम्ही विश्वास घात केल्यामुळे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसले, शिवसेनेला अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद देण्याचे आपण मान्य केलं होतं. देवेंद्र यांचं वक्तव्य उपलब्ध आहे ते पहा व स्वता तिथे स्वतः काय बोलले.
आम्ही अमित शाह समोर सत्तेचे वाटप करतांना 50-50 टक्के, पॉवर शेअरिंग फिफ्टी-फिफ्टी हा त्यांचा शब्द आहे. त्याने विश्वास घात केल्यावर इतर कोणी आमचा विश्वासघात केला नाही.
देवेंद्र फडणवीस अजून पहाटेच्या शपथविधीच्या वैफल्यातून बाहेर आलेले नाही. त्यामुळे त्यांना अजून ते स्वप्न पडत आहे आणि ते दचकून उठत आहे. त्यांनी कुठलाही गौप्यस्फोट केलेला नाही.
चाळीस-पन्नास आमदारांचा सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबईत शपथविधी झाला, तो तुम्ही शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून झाला असे सांगू शकतात. महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस सरकार विषयी अत्यंत तिरस्कार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. नागपूर विदर्भात आणि उद्याच्या पोटनिवडणुका कसबा आणि चिंचवडला होत आहे तिथेही दारुण पराभव दिसतो आहे म्हणून लोकांना गोळा करायचं म्हणून अशी ते सांगत आहे.
अजित दादा पवार ठामपणे मजबुतीने म्हणून करतात, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या बंदनाम्या आणि सहानुभूती मिळवण्यासाठी आपण कितीही काहीही केलं तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
आता पहाटेच्या शपथविधीवर बोलून काहीही होणार नाही. त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. उलट भाजपने त्यावेळी आमच्याशी विश्वासघात केला. त्यामध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याबाबत ठरलं होतं.
ठरलेलं असतांनाही तुम्ही विश्वासघात केला आणि आता अडीच वर्षानंतर पुन्हा सहा सात महिन्यापूर्वी टेस्ट ट्यूब बेबी मांडीवर घेऊन बसला आहात. त्यावर तुम्ही का बोलत नाही असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी विचारला आहे.