शिंदे सरकार राहणार की जाणार? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; त्यापूर्वीच संजय राऊत काय म्हणाले?

दुर्देवाने आजचं मरण उद्यावर ढललंल जात आहे. बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेवर राहता कामा नये हा निर्णय कोर्टाकडून अपेक्षित होता.

शिंदे सरकार राहणार की जाणार? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; त्यापूर्वीच संजय राऊत काय म्हणाले?
शिंदे सरकार राहणार की जाणार? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 10:57 AM

नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार राहणार की जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा होता अशी आमची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तारखावर तारखा पडत असल्या तरी एक दिवस शिंदे सरकारवर नक्कीच हातोडा पडेल, असं सांगतानाच उद्याच्या निर्णायकडे आम्हीही अपेक्षेने पाहत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत दिल्लीत आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधाना केलं आहे. ज्या पद्धतीने पक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला ते घटनेच्या कोणत्या नियमात बसतं? अशा प्रकारे घटनेची मोडतोड करून राज्यात सरकारं पाडण्यात आली आणि बसवण्यात आली. असंच सुरू राहिलं तर देशात घटनाच अस्तित्वात राहणार नाही. न्यायालयाचं महत्त्व राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे. ज्यांनी पक्षांतर केलं. घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. त्यांचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर आहे. त्यामुळे महाशक्ती विरुद्ध घटना असा सामना आहे. आम्ही न्यायालयाला मानतो त्यामुळे आमची मागणी योग्य आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

दुर्देवाने आजचं मरण उद्यावर ढललंल जात आहे. बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेवर राहता कामा नये हा निर्णय कोर्टाकडून अपेक्षित होता. आजही आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे आम्ही अपेक्षेने पाहतो आहे, असंही ते म्हणाले.

देशाच्या न्यायव्यवस्थेत काय सुरू आहे हे सर्वांना माहीत आहे. पण कोर्टात अजून सत्त्व आणि तत्त्व टिकून आहे. तारखावर तारखा पडत असल्या तरी एक दिवस या सरकारवर हातोडा पडेल. तो दिवस नक्कीच येईल, असंही ते म्हणाले.

मंत्रिमंडळात बदल करणं हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. मंत्र्यांची कामगिरी पाहून किंवा भ्रष्टाचारावरून मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं जातं. शिवाय इतरांना राजकारणात संधी द्यायची असते म्हणून काढलं जातं. फेरबदल जरी झाले तरी तेच पत्ते पिसायचे असतात. देशात नवीन काय घडणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....