Sant Premanand: संत प्रेमानंद यांची तब्येत बिघडली, पदयात्रेलाही आले नाहीत,आश्रमातून आली बातमी, भक्त रडू लागले
शुक्रवारी रात्री संत प्रेमानंद महाराजांच्या पदयात्रेच्या मार्गावर भक्त त्यांची वाट पाहत उभे होते. संत प्रेमानंद महाराजांच्या निघण्याची वेळ झाली होती, पण तरीही महाराज आले नसल्याने भक्तांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. त्यातच त्यांच्या प्रकृती विषयी घोषणा झाल्याने भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. अचानक त्यांचा आरोग्य बिघडल्याने त्यांची रात्र पदयात्राही शुक्रवारी झाली नाही. भक्त त्यांची वाट पाहात होते.त्याचवेळी आश्रमातील कर्मचाऱ्यांनी उद्घोषणा केली की प्रेमानंद महाराजांच्या तब्येत अचानक बिघडल्याने ते रात्र पदयात्रेत येणार नाहीत. त्यामुळे पदयात्रे निमित्ताने त्यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी तासनतास बसलेल्या भक्तांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागलेय..
वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांची रात्र पदयात्रा खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या पदयात्रे दरम्यान भक्त त्यांच्या सोबत चालतात आणि त्यांचे दर्शन आणि आशीवार्द घेत असतात. त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा एकमेक पर्याय असलेली ही रात्रकालीन पदयात्रा भक्तांच्या दृष्टीने अमुल्य असते. लोक यासाठी लांबून येत असतात. प्रेमानंद महाराजांची प्रवचन ऐकणारा मोठा भक्त वर्ग आहे. त्यांना भेटायला सर्वच क्षेत्रातील लोक येत असतात.




आश्रमातून आली बातमी
संत प्रेमानंद महाराजाच्या पदयात्रेच्या मार्गावर शुक्रवारी रात्री भक्त त्यांची वाट पाहात होते. संत प्रेमानंद महाराजाच्या निघण्याची वेळ झाली तर महाराज कसे आले नाहीत. यामुळे भक्त काळजीत होते. त्यानंतर काही वेळाने आश्रमाच्या वतीने माईकवरुन अनाऊन्समेंट करण्यात आली. अचानक महाराजांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे रात्रीच्या पदयात्रेसाठी प्रेमानंद महाराज येणार नाहीत. हे ऐकल्यानंतर भक्तांच्या अश्रूंचा बांध फुटला..भक्तांमध्ये नैराश्य दाटले आहे.