बेंगळुरुकडून ‘पाकिस्ताना’तील लहानगीला प्रेमाची भेट, माणुसकी पुन्हा जिंकली…
अमायरा या लहानीला आजार झाला आणि तिच्या आई वडिलांनी डॉक्टरांचा शोध सुरु केल्यावर त्यांना पहिलंवहिलं नाव समजलं ते भारतातील डॉ. भट यांचेच. म्हणून त्यांनी कराचीतून थेट बेंगळुरू गाठले.
बेंगळुरुः इंग्रजांनी नकाशावर एक रेषा काढून देशाचे दोन तुकडे केले. त्यानंतर दोन्ही देशातील अनेक घरात 1947 मध्ये विभागला गेलेल्या दोन्हीही भागात संघर्ष कधी चुकला नाही. चार युद्धे (Pak-Indai War) लढूनही या दोन्ही देशांतील नागरिकही प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र येण्याची संधी पाहतात. संकटाच्या काळात एका देशावरचं संकटाला दुसरा देश आपसूकच धावून येतो. आणि त्याच्या मदतीसाठी तयार राहतो. अमायरा या 2 वर्षाच्या मुलीने 75 वर्षांच्या स्वातंत्र्य झालेल्या देशांना असाच आणखी एक क्षण दिला आहे.
भारतातील बंगळुरू येथील एका रुग्णालयाने पाकिस्तानी मुलगी अमायरा सिकंदर खान (Amyra Sikandar Khan) या मुलीला जीवनदान दिले आहे. या हॉस्पिटलमध्ये अमायरावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
अमायरा ही कराचीस्थित क्रिकेट समालोचक सिकंदर बख्त यांची दोन वर्षांची मुलगी आहे. तिच्यावर नुकतेच नारायणा हॉस्पिटलमध्ये बीएमटीच्या मदतीने म्युकोपोलिसॅकरिडोसिस टाईप-1 वर उपचार करण्यात आले होते.
याबाबत नारायणा हेल्थकेअरच्या अध्यक्षा आणि संस्थापक देवी शेट्टी सांगतात की, हा आजार घातक आणि प्राणघातक आहे. त्या म्हणतात की, म्यूकोपोलिसेकेरिडोसिस ही एक दुर्मिळ स्थिती आहे. जी डोळे आणि मेंदूसह शरीराच्या अनेक भागातील अवयवार परिणाम करते.
अमायरावर उपचार करताना वडिलांच्या बोन मॅरोचा वापर करून अमायराला वाचवण्यात आले आहे. रूग्णालयात मुलीवर उपचार करणारे डॉ सुनील भट सांगतात की म्युकोपोलिसॅकरिडोसिस या स्थितीमुळे शरीरातील एंजाइमची कमतरता असते.
त्या एन्झाइमच्या कमतरतेमुळे रुग्णाच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे यकृत आणि प्लीहाही वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणजे हाडांमध्येही बदल दिसून येतो.
वास्तविक, प्लीहा रक्त पेशींची पातळी नियंत्रित करते. हे रक्त तपासते आणि जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून टाकते. अशी दुर्मिळ परिस्थिती असलेली बहुतेक मुले 19 वर्षांची होईपर्यंत अपंग होतात.
आणि त्यापैकी बहुतेकांना आपला जीवही गमवावा लागतो अशी माहितीही त्यांनी सांगितली. त्यामुळे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा संभाव्य उपचारांपैकी एक आहे.
डॉ.भट यांनी अमायरावर केलेल्या उपचारपद्धतीविषयी सांगताना म्हणाले की, या लहान मुलीला भावंड नव्हते. त्यामुळे आम्ही नात्याबाहेरील एका दात्याचा शोध घेतला.
पण तोही उपलब्ध झाला नाही. म्हणून आम्ही पालकांपैकी एकाचा अस्थिमज्जा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आणि प्रत्यारोपणाच्या चार महिन्यांनंतर डॉक्टरांना बाळ निरोगी असल्याचे आढळून आले. आणि तिचे एन्झाईम सामान्यपणे काम करू लागल्याचेही त्यांनी सांगितले.
मुलीची आई सदाफ म्हणाली की, तिला या आजाराविषयी काहीही माहिती नाही मात्र या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ शोध घेऊन त्यांनी डॉ. भट यांच्याशी संपर्क साधला होता.