मुंबई: तुम्ही एखादे घर किंवा दुकान स्वस्तात खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्याकडून सध्या काही मालमत्तांचा लिलाव केला जात आहे. यामध्ये तुम्हाला एखादे घर किंवा दुकान स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. ( cheap properties auction by SBI and PNB)
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 30 डिसेंबरपासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामध्ये व्यावसायिक, रहिवासी आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय, काही घरंही लिलावासाठी उपलब्ध असतील.
कर्जाची परतफेड न करु शकलेल्या ग्राहकांच्या मालमत्तांचा बँकांकडून लिलाव केला जातो. भारतीय बँक लिलाव मालमत्ता सूचना (IBAPB) या पोर्टलवर बँकांकडून वेळोवेळी अशा मालमत्तांची यादी जाहीर केली जाते. अशा लिलावांमध्ये तुम्ही घर किंवा दुकाने स्वस्तात खरेदी करू शकता.
तुम्हाला PNB च्या लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर काही औपचारिक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. बोली लावणाऱ्या व्यक्तीला आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या माध्यमातून नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला KYC अपलोड करावे लागतात. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लिलाव प्रक्रियेला 30 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यासंदर्भात SBI ने अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही दिल्या होत्या. या लिलाव प्रक्रियेत रहिवासी, व्यापारी आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे.
* लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
* ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉजिट म्हणजे EMD जमा करणे बंधनकारक आहे.
* संबंधित बँकेच्या जवळच्या शाखेत तुमची कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे.
* लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-सिग्नेचर आवश्यक.
* EMD आणि KYC जमा केल्यानंतर ई-ऑक्शन करणाऱ्या संस्थेकडून तुम्हाला ईमेल आयडी आणि लॉगिन पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
( cheap properties auction by SBI and PNB)