अयोध्या वाद: मध्यस्थीचा निकाल राखीव
Ayodhya Case LIVE: नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने अयोध्या जमीन वादाप्रकरणी मध्यस्थी नेमण्याबाबतचा निकाल राखीव ठेवला आहे. मध्यस्थी मान्य नसेल तर आमचा निकाल मान्य होईल का? अशी विचारणा यावेळी कोर्टाने पक्षकारांना केली. मध्यस्थीसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकारांचा पाठिंबा आहे. मात्र हिंदू महासभेने मध्यस्थीला विरोध केला आहे. याप्रकरणी आम्हाला लवकर निर्णय द्यायचा आहे, असं कोर्टाने नमूद केलं. […]
Ayodhya Case LIVE: नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने अयोध्या जमीन वादाप्रकरणी मध्यस्थी नेमण्याबाबतचा निकाल राखीव ठेवला आहे. मध्यस्थी मान्य नसेल तर आमचा निकाल मान्य होईल का? अशी विचारणा यावेळी कोर्टाने पक्षकारांना केली. मध्यस्थीसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकारांचा पाठिंबा आहे. मात्र हिंदू महासभेने मध्यस्थीला विरोध केला आहे. याप्रकरणी आम्हाला लवकर निर्णय द्यायचा आहे, असं कोर्टाने नमूद केलं.
रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षकारांना विचारणा केली की जर शक्य असेल तर हे प्रकरण मध्यस्थांमार्फत सोडवलं जावं. हे प्रकरण केवळ जमिनीचा मुद्दा नाही, तर याला भावना जोडल्या आहेत, असं कोर्टाने नमूद केलं.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने स्पष्ट केलं की, आम्ही याप्रकरणी त्वरीत सुनावणी करु इच्छित आहे. जर पक्षकारांना मध्यस्थांची नावं सुचवायची असतील, तर ती नावं देऊ शकता, असं कोर्टाने सांगितलं.
SC on Ayodhya Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute case: Justice SA Bobde says, “We have no control over what happened in the past, who invaded, who was the king, temple or mosque. We know about the present dispute. We are concerned only about resolving the dispute,” pic.twitter.com/23dEMnKrMH
— ANI (@ANI) March 6, 2019
सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
न्यायमूर्ती बोबडे म्हणाले, “हे प्रकरण आपसात चर्चेने सोडवायला हवं. आपण घडलेल्या घटना बदलू शकत नाही. आम्ही केवळ सध्यस्थिती पाहू शकतो. केवळ जमिनीचा वाद नाही तर हे प्रकरण मन,मेंदू आणि भावनांशी जोडलं आहे”
याशिवाय आम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य समजतंय. चर्चेसाठी एक समिती हवी, मध्यस्थांना गोपनीय ठेवायला हवं. चर्चेतील तपशील बाहेर आल्यास वाद निर्माण होऊ शकतो, असंही न्यायमूर्ती बोबडे म्हणाले.
मध्यस्थांचा प्रश्न सुप्रीम कोर्टात हिंदू महासभेने मध्यस्थांना स्पष्ट विरोध केला. भगवान रामाची जमीन आहे, दुसऱ्या पक्षकारांना त्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे प्रकरण मध्यस्थांकडे पाठवू नये, असं हिंदू महासभेने कोर्टात सांगितलं. दुसरीकडे निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्डाने मध्यस्थीला तयारी दर्शवली.
सोपं काम नाही – न्यायमूर्ती चंद्रचूड सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हा वाद म्हणजे सोपं काम नसल्याचं म्हटलं. हा वाद दोन समूहामध्ये आहे, त्यामुळे सर्वांना तयार करणं सोपं नाही. एकमेकांशी चर्चा करुन तोडगा निघावा, पण कसा? हा खरा प्रश्न आहे, असं त्यांनी नमूद केलं.
काय आहे अयोध्या जमीन वाद?
राम जन्मभूमीचा वाद हा अनेक वर्ष जुना आहे. शिवाय हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच तणावाचा मुद्दा राहिलेला आहे. अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बनवण्याची मागणी आहे. या जागेवर रामाचं मंदिर तोडून बाबरी मशिद बांधण्यात आली असा हिंदूंचा दावा आहे.
हिंदूंच्या मते, 1530 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकीने मंदिराच्या जागी मशिद बांधली. त्यामुळेच 90 च्या दशकात राम जन्मभूमी प्रकरणाने देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती.
संबंधित बातम्या
अयोध्या प्रकरण: 16 मिनिटे सुप्रीम कोर्टात खडाजंगी
अयोध्या प्रकरण : पहिल्याच सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची माघार