संजीव खन्ना असतील नवीन CJI; सरन्यायाधीश चंद्रचुड यांची शिफारस, त्यानंतर महाराष्ट्रातील या न्यायमूर्तीच्या नावाची चर्चा

Supreme Court CJI : सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी नावाची शिफारस केली आहे. केंद्र सरकारला त्यांनी याविषयीचे पत्र लिहिले आहे. त्यानुसार न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. तर राज्यातील वकिलांमधील लोकप्रिय न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

संजीव खन्ना असतील नवीन CJI; सरन्यायाधीश चंद्रचुड यांची शिफारस, त्यानंतर महाराष्ट्रातील या न्यायमूर्तीच्या नावाची चर्चा
संजीव खन्ना यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 11:37 AM

सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. एका वृत्तानुसार, त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यांनी 1983 साली वकिलीला सुरुवात केली होती. त्यानंतर देशात लवकरच दुसरा एससी सरन्यायाधीश असेल. राज्यातील वकिलांमधील लोकप्रिय न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पुढील CJI चे नाव पक्कं

केंद्र सरकारला सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे 13 मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले होते. तर न्यायमूर्ती खन्ना हे 18 जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जज झाले. यापूर्वी त्यांनी हायकोर्ट आणि इतर न्यायाधिकरणावर सेवा दिली आहे.

हे सुद्धा वाचा

6 महिने CJI पदावर

NALSA म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर न्यायमूर्तींच्या सेवानिवृत्तीची तारीख समोर येते. त्यानुसार, न्यायमूर्ती खन्ना हे 13 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतली तर ते या पदावर सहा महिने कार्यरत असतील.

न्यायमूर्ती बी आर गवई

दुसरे एससी न्यायमूर्ती मिळणार

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते मे 2025 मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळू शकतात. ते देशातील दुसरे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्यायमूर्ती केजी बालकृष्ण हे देशातील पहिले एससी सरन्यायाधीश होते. ते 11 मे 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले.

न्यायमूर्ती गवई यांना इतका कालावधी

सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाल्यावर न्यायमूर्ती बी आर गवई यांना या पदावर 6 महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतील. सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळानुसार, 16 मार्च 1985 रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली. न्यायमूर्ती गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्यानंतर या पदावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव चर्चेत आहे.

Non Stop LIVE Update
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.