NSA अजित डोभाल यांच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसण्याचा प्रयत्न! घातपाताचा कट?
दिल्ली पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक या व्यक्तीची चौकशी करते आहे. दिल्लीतील लोधी कॉलनीत असलेल्या स्पेशल सेलच्या ऑफिसात या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. नेमका हा व्यक्ती कोण आहे? त्यानं नेमकं असं का केलं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. हा व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुतील राहाणार असल्याचं वृत्त आजतकनं दिलं आहे. दिल्ली पोलिसांचं (Delhi Police) दहशतवादविरोधी पथक या व्यक्तीची चौकशी करते आहे. दिल्लीतील लोधी कॉलनीत असलेल्या स्पेशल सेलच्या ऑफिसात या व्यक्तीची कसून चौकशी (Investigation on) सुरु आहे.
कुणाचा डोळा?
पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीनं आपल्याला रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा केला होता. आपल्यावर चीप लावण्यात आली असल्याचंही या इसमानं म्हटलं होतं. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीची पूर्ण चौकशी केली, त्याची तपासणी केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारची चीप या व्यक्तीच्या शरीरवार आढळून आली नाही.
ताब्यात घेण्यात आलेला हा व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुमधील राहणारा आहे. दिल्ली पोलिसांचं दहशतवादविरोधी पथकाचं स्पेशल सेल या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी आता अजित डोबाल यांच्या घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवलाय. या ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे.
एक व्यक्ती गाडी घेऊन अजित डोभाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना सकाळी समोर आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
Heavy security put in place at #AjitDoval’s house after man tries to ram car inside his residence
Colleague @arvindojha reports person is frm Bangalre & claimed to be operated via remotecontrol with a chip in his body. MRI refutes claim#DelhiPolice doing further investigation pic.twitter.com/jnnqcHwppp
— Sreya (@Sreya_Chattrjee) February 16, 2022
अजित डोभाल यांच्यावर कुणाचा डोळा?
अजित डोभाल हे 1972 सालचे आयबी अधिकारी आहेत. भारतीय गुप्तहेर म्हणून त्यांनी अनेक बड्या कारवाया केल्या आहेत. सात वर्ष ते पाकिस्तानमध्ये राहिले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू थंडर यात अजित डोभाल यांची महत्त्वाची भूमिका होती. 1999 साली झालेल्या विमान अपहरणावेळी अजित डोभाल यांना सरकारच्या वतीनं मुख्य वार्ताहर बनवण्यात आलं होतं.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर अजित डोवाल यांच्यावर मोदींनी महत्त्वाची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या नेतृ्त्तावखाली भारतानं 26 फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता. यावेळी बालाकोटवर हल्ला करत जेश-ए-मोहम्मदच्या अतिरेकी अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
दहशतवाद्यांकडून डोभाल यांच्या हत्येचा ‘पाकिस्तानी कट’, 2019 मध्ये NSA ऑफिसची रेकी
जेव्हा काँग्रेस नेत्याला अजित डोवालच्या मुलाची माफी मागावी लागली
NSA प्रमुख अजित डोवाल मैदानात, अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाला हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?