Vande Bharat Express | वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांने केले असे कृत्य की झाला हंगामा, प्रवाशाला झाली अटक

वंदेभारत एक्सप्रेस या भारताच्या पहिल्या सेमी हायस्पीड आणि आरामदायी ट्रेनचा प्रवास सध्या चर्चेत आहे. देशातील विविध राज्यात तब्बल 25 वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत.

Vande Bharat Express | वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांने केले असे कृत्य की झाला हंगामा, प्रवाशाला झाली अटक
Secunderabad-to-Tirupati-Vande-Bharat-ExpressImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 12:56 PM

हैदराबाद | 10 ऑगस्ट 2023 : नेहमीच निरनिराळ्या कारणांनी चर्चेत येणारी वंदेभारत एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यावर कोणी दगडफेक केलेली नाही. किंवा तिने गुरांना देखील उडविलेले नाही. यावेळी वेगळ्याच कारणाने वंदेभारत एक्सप्रेस चर्चेत आली आहे. यावेळी एका प्रवाशाने केलेल्या उपदव्यापाने वंदेभारत एक्सप्रेस चर्चेत आली आहे. काय नेमके केले या प्रवाशाने की त्याला अटक करावी लागली आहे. ते पाहूया…

वंदेभारत एक्सप्रेस या भारताच्या पहिल्या सेमी हायस्पीड आणि आरामदायी ट्रेनचा प्रवास सध्या चर्चेत आहे. देशातील विविध राज्यात तब्बल 25 वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आंध्रप्रदेशातील तिरुपती ते सिकंदराबाद अशा धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. गुडुर येथून ही वंदेभारत एक्सप्रेस जात असताना आणि तिला तिच्या गंतव्य स्थानकात पोहचण्यास आठ तासांहून अधिक वेळ शिल्लक असताना एका प्रवाशाने केलेल्या गोंधळामुळे ट्रेनमध्ये आणीबाणी माजली.

वंदेभारत एक्सप्रेसमध्ये एका विनातिकीट प्रवाशाने शिरकाव करीत टीसीपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडून तो लपून बसला. परंतू वंदेभारतमधून फुकटात प्रवास करण्याचा त्याचा प्लान त्याच्याच एका गोष्टीने उधळला गेला. या ट्रेनमध्ये फायर अलार्म असल्याचे माहीती नसलेल्या या प्रवाशाने त्याने टॉयलेटमध्ये सिगारेट पेटविली आणि फायर अलार्मवाजू लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. अग्निशमन यंत्रणा स्वयंचलितपणे कार्यरत झाली आणि कमार्टमेंटमध्ये पाण्याचे फवारे उडू लागले. त्यामुळे प्रवाशांनी घाबरुन ट्रेनच्या टॉकबॅक यंत्रणेद्वारे ट्रेनच्या गार्डशी संपर्क साधला.

या संदर्भात शेअर झालेल्या व्हिडीओत कोचमध्ये एअरोसोल पार्टीकल हवेत उडाल्याने धुरकट दिसत आहेत, त्यामुळे घाबरलेले प्रवासी दिसत आहेत. येथे व्हिडीओ पाहा…

त्याच दरम्यान ट्रेन मनुबुलु या स्थानकात थांबविण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्वरीत हालचाली करीत अग्निशमन उपकरणासह धाव घेतली आणि टॉयलेटचे दरवाजे तोडले तर आत प्रवासी सापडला. त्यानंतर नेल्लोरे येथे या प्रवाशाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एका प्रवाशांच्या बेशिस्तीचा संपूर्ण रेल्वे यंत्रणेसह प्रवाशांना त्रास झाला असून वंदेभारतमध्ये सुरक्षा असताना हा प्रवासी विनातिकीट कसा काय चढला याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

एक अनधिकृत प्रवाशाने तिरुपतीहून सुटलेल्या वंदेभारत एक्सप्रेसच्या C – 13 कोचमध्ये प्रवेश करीत स्वत: ला टॉयलेटमध्ये कोंडून घेतले. त्याने टॉयलेटमध्ये सिगारेट पेटविल्याने टॉयलेटमधील फायर अलार्म आणि आग विझविणारी यंत्रणा स्वयंचलितपणे कार्यरत झाली. असे दक्षिण मध्ये रेल्वे ( SCR ) झोन विजयवाडा डीव्हीजनच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.