सीमा हैदरच्या पहिल्या पतीचा मोठा गौप्यस्फोट; एजंटमार्फत आली, म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि योगींवर विश्वास

सीमा हैदर कधीही आपल्या शब्दावर ठाम राहत नाही. ती संध्याकाळी एक गोष्ट सांगते आणि सकाळी काही तरी वेगळी. सीमा एका एजंटमार्फत भारतात आली आहे.

सीमा हैदरच्या पहिल्या पतीचा मोठा गौप्यस्फोट; एजंटमार्फत आली, म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि योगींवर विश्वास
SIMA HAIDAR, SACHIN AND GULAM HAIDER
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 6:55 PM

पाकिस्तान | 08 जानेवारी 2024 : पाकिस्तानामधील सीमा हैदर हिने भारतात येऊन हिंदू रिवाजानुसार प्रियकर सचिनसोबत लग्न केले. आता ती हिंदू रितीरिवाजांचे पालन करत आहे. सचिनसोबत खूप खूश असल्याचे तिने म्हटले आहे. सीमा यांनाही चार मुले आहेत. नुकतीच तिने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सीमा हैदर हिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदर याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये त्यांनी आपण लवकरच भारतात येणार असल्याचे म्हटले आहे. गुलाम हैदर यांनी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही नावे घेतली आहेत.

गुलाम हैदर यांनी आपल्या व्हिडीओमध्ये सीमा हैदरचे वर्णन निर्लज्ज असे केले आहे. ‘सीमा हैदर तिथे बसून हिंदू आणि मुस्लिममध्ये फूट पाडता. लोकांच्या मनात द्वेष निर्माण करतात. सीमा हैदरला ना माणुसकी कळते ना आदर. ती नुसती बसून बकवास बोलत असते. प्लीज असं करू नकोस सीमा, तुला पश्चाताप होईल, असे गुलाम हैदर म्हणाले आहेत.

‘सीमा हैदर तू विवाहित असूनही दुसऱ्या पुरुषासोबत गेली आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला माझे घर दिले. पण, तू मला त्याची शिक्षा दिलीस. तु पाकिस्तानी आहेस भारतीय नाही. तू पाकिस्तानात येशील तेव्हा पाकिस्तानचे कोणतेही न्यायालय तुला वाचवू शकणार नाही. कोर्ट नक्कीच शिक्षा करेल, असा इशाराही त्यांनी नवीन व्हिडिओमध्ये दिला आहे.

सीमाला तुरुंगात टाकावे

गुलाम हैदर यांनी पुढे असाही आरोप केला आहे की, सीमा हैदर कधीही आपल्या शब्दावर ठाम राहत नाही. ती संध्याकाळी एक गोष्ट सांगते आणि सकाळी काही तरी वेगळी. सीमा एका एजंटमार्फत भारतात आली आहे. ती पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत असल्याची दिशाभूल करत आहे. त्यामुळे भारत सरकारने सीमाला लवकरात लवकर तुरुंगात टाकावे. बॉर्डर ही सर्वांसाठीच एक वेदनादायक जागा बनली आहे. त्याविरुद्ध कडक कायदा करावा असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावरही विश्वास

सीमा हैदर तुमचा चेहरा उघड करण्यासाठी एक हैदर पुरेसा आहे. तुम्ही लबाड आणि फसव्या आहात. लोकांच्या मनात फक्त द्वेष निर्माण करत आहात. तू तुझ्या धर्माची झाली नाही तर हिंदू धर्माची कशी होणार? असा सवालही त्यांनी केला. लोक तुम्हाला कधीच चांगले म्हणणार नाहीत. मी लवकरच भारतात येत आहे. सीमा, लक्षात ठेव तुला फासावर नेणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. जगात न्यायालये आहेत. तुम्ही राहता त्या देशातील न्यायालयांवर माझा विश्वास आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावरही माझा विश्वास आहे. मला न्यायावर विश्वास आहे आणि तो लवकरच मिळेल असेही त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.