Seema Haider | सीमा हैदर आणि सचिनची तब्येत बिघडली, घरी लावलंय सलाईन, वकीलांनीही घेतली सीमाची भेट
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर हिची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. ती सचिनसोबत नोएडा येथे रहात होती. सध्या तिच्या तब्येतीबद्दल काही अपडेट्स समोर आले आहेत.
नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : पाकिस्तानातून अवैध रितीने आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीणा (Sachin Meena) यांचं प्रेमप्रकरण सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सीमाबद्दल सुरक्षा यंत्रणांचा संशय बळावत चालला असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र सध्या या प्रकरणातील नवी माहिती समोर आली आहे. सीमा हैदर आणि सचिन यांची तब्येत बिघडली आहे. दोघेही सध्या घरी असून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.
दरम्यान सीमाला भेटण्यासाठी एक वकील तिच्या घरी यानंतर होते, अशी माहिती समोर आली आहे. यूपी एटीएसने सीमा आणि सचिन या दोघांचीही कसून चौकशी केली आहे. त्यानंतर घरी पोहोचल्यावर दोघांनीही पोलिसांच्या उपस्थितीतच मीडियाशी संवाद साधला.
आपण काहीही लपवले नाही, सगळं खरं खरं सांगितलं आहे, असे यूपी एटीएस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सीमा हैदरने सांगितले. मी फक्त माझ्या प्रेमासाठी व्हिसाशिवाय भारतात आले आहे. मी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो मिळू शकला नाही, म्हणून हे पाऊल उचलावे लागले, असेही सीमाने नमूद केले.
खरंतर नोएडातील सचिन मीणा आणि पाकिस्तानातील सीमा हैदर यांची प्रेमकहाणी २०१९ मध्ये सुरू झाली. त्यावेळी कोरोना पसरला होता, लोक घरात कैद झाले होते. पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या सीमाने तिच्या मोबाईलमध्ये PUBG गेम डाउनलोड केला होता. सचिनही नोएडामध्ये हा खेळ खेळायचा.
PUBG खेळताना सुरू झाली लव्हस्टोरी
PUBG खेळताना सीमाने पहिल्यांदाच भारतातील सचिन मीणासोबत ऑनलाईन PUBG खेळायला सुरुवात केली. PUBG खेळताना दोघांमध्ये बोलणं वाढलं. दोघांनी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. एकमेकांना नंबर दिले. व्हिडिओ कॉलही सुरू झाले, त्यांची जवळीक वाढली. त्यानंर एक दिवस त्यांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं. मात्र त्यांना हे मीहत नव्हतं की त्यांची ही भेट दोन्ही देशांमधील एवढा मोठा मुद्दा बनेल.
सचिन-सीमाचे फोटो आले समोर
नेपाळमध्ये भेटल्यावर सचिन- सीमा हैदरने मंदिरात लग्न केल्याचे म्हटले होते. त्यांच्या या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर सीमा नेपाळ मार्गे भारतात आली आणि ग्रेटर नोएडामध्ये सचिनसोबत राहत होती. फोटोंमध्ये सीमा एका वधूसारखी नटली होती, एका फोटोत ती सचिनचा आशीर्वाजद घेतानाही दिसत आहे.